जगण्यात मौज आहे,
सुखदुःखाची फौज आहे,
रिवाजांचे शासन आहे,
रीतींचे आसन आहे,
आश्वासनांचे नभ आहे,
निराशांचा पाऊस आहे,
क्वचित आशेचा किरण आहे,
कल्पनांचे साम्राज्य आहे,
वज्राहून कठोर वास्तव आहे, लोण्याहून मऊ हृदय आहे सैतानाहून कठोर भावना आहे,
संताहून हळवे कुठे मन आहे,
देवाहून थोर कधी माणुसकी आहे, पत्थराहून टणक अनीती आहे,
अत्याचाराचा विळखा आहे,
कधी प्रेमाचा झरा आहे, जिव्हाळ्याचा शब्द बोलका,
मुके प्रेम कधी थोर आहे,–!!
आभाळाहून मोठे मन आहे, विहिरीत कोंडलेले कधी सान आहे,
सुदैव कधी जादूगार आहे,
कधी दुःख मोठे प्रहार आहे,–
जीव कधी कसानुसा आहे,
कधी कधी त्याला भरवसा आहे, दुनियेत कधी ईश्वराचा वास आहे मध्येच कधी, राक्षसी भास आहे,–!
*जगण्यात मौज आहे,
सुखदु:खांची फौज आहे*—!!!
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply