ज्याचं त्याने ठरवावं
आपलं आपण कसं जळाव
धडधडत्या चीतेतली उद्धवस्त करणारा अग्नी व्हावं
कि क्रांतीतल्या पेटत्या मशालीची ज्योत व्हावं
कि व्हावं स्वार त्या वनव्यावर जे सगळं जंगल जाळून जात
ज्याचं त्याने ठरवावं
आपलं आपण कसं जळाव
उब देणारी शेकोटीतली तापलेली आग व्हावं
कि तप्त पोटातल्या अग्नीला विझवणारी चुलीतली राख व्हावं
कि स्वतः सहित जळणाऱ्या समईतली प्रकाशीत मंद मंद वात व्हावं.
ज्याचं त्याने ठरवावं
आपलं आपण कसं जळाव..
— वर्षा कदम.
Leave a Reply