निन्हीसांज झाली, अंधार पडला
खेळ क्रिकेटचा संपवावा लागला
हिरमोड होऊन दिपू परतला
हात पाय धुवायला गेला
तोच आईने फर्मान सोडले
देवांना थोरांना नमस्कार करा
शुभंकरोती सार्यांनी म्हणा
तोच बाबंनी फर्मान सोडले
लगेच बसा अभ्यासाला
दिपू खोलीत जाऊन बसला
जादूगाराचा धडा वाचला
नागोबाची कविता वाचली
तोच अचानक वीज गेली
काळी काळी सावली दिसू लागली
कोपर्यात हालचाल जाणवू लागली
साप साप म्हणून दिपू ओरडला
काठी घेऊन बाबा आले
विजेरी घेऊन आई आली
दिपूने आईला मिठी मारली
बाबांनी कोपर्यात डोकावून पाहिले
काठीने वेटोळे उडवून दिले
तोच पटकन विज आली, टकमक सारी बघु लागली
केबळचे वेटोळे समोर दिसले
सारे खदाखदा हसू लागले
गम्मत झाली जम्मत झाली
तोच जेवण्याची वेळ झाली.
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply