आता दुनियेत| होती खूप हाल|
सुकलेत गाल| शोषितांचे||१||
पाहिले अनेक|दु:खी जीव येथे|
चित्त माझे तेथे|पांडूरंगा||२||
करतो मी पूजा|मनी तुझा ध्यान|
नाही मला भान|देवा आता||३||
थोडी जनसेवा| हातून घडावी|
साथ रे मिळावी| देवराया||४||
भाव पामराचा| समजून घ्यावा|
आशिष असावा| देवा तुझा||५||
पुसू देत डोळे| भरवू दे घास|
जगण्याची आस| वाढो त्यांची||६||
अनाथांचे हास्य| फ़ुलवेन आता|
बनुनी त्यांचा पिता| देतो ग्वाही||७||
— महेंद्रकुमार ईश्वरलाल पटले(ऋतुराज)
दि. २२/०९/२०१९
Leave a Reply