हेही माझे, तेही माझे
वादविवाद उगा कशाला
जे जे आहे ते उपभोगावे
सुखे जपावे मनामनाला
जन्मी लाभो, मन:शांती
मूलमंत्र हा परमसुखाचा
स्पंदनेही, इथे अशाश्वत
सांभाळावे जीवाजीवाला
संचित, सारे ते सत्कर्माचे
जन्म, मानवी युगायुगांचा
येणे, जाणे रिक्त ओंजळी
निर्मोही, बिलगावे मृत्यूला
सत्य! जगती या जन्ममृत्यू
अमरत्व,न लाभले कुणाला
रामकृष्णही, इथे आले गेले
सत्यसाक्ष ही या चराचराला
— वि.ग.सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र. ३२.
२ – २ – २०२२.
Leave a Reply