गोड शब्द बोबडे, लकब मनास आवडे ।
शब्दांची भासली जाण, नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान ।।
भावनांचा उगम दिसला, मनी व्यक्त होई हालचालीतूनी ।
रागलोभ अहंकारादी गुण, दिसून येती जन्मापासून ।।
देश-वेष वा जात कुठली, सर्व गुणांची बिजे दिसली ।
हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी ।।
प्रसंग घडता अवचित , बाह्य जगाते विसरत ।
उफाळून येती सुप्त भावना, मानवी त्या जन्मखुणा ।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply