घोड्यावरती बसू देईना, चालू देईना पायी
जगाची ही रीत , कशी समजत नाही ..१,
सज्जनतेची वस्त्रे लेवूनी, निर्मळ जीवन आले
आपण बरे नि काम बरे, तत्व अंगीकारले…२,
मोठा झाला शिष्ठ समजोनी, वाळीत टाकीले मला
दुष्कृत्यामध्ये साथ हवी, त्यातील कांहीं व्यक्तीला…३,
जीवन जगणे कठीण होता, मार्ग तो बदलला
आगळी धडपड करूनी, यश मिळाले मला….४,
मिसळत होतो सर्वामध्ये, अतिशय प्रेमानी
तरीही ऐकला ‘शिष्ट’ शब्द , माझ्याच कानानी..५,
व्यक्ती तितक्या प्रकृती , असती येथे
भिन्नतेचे स्वभाव तेंव्हा , निराशा मनी आणते ..६,
चित्ती येईल तसेच करावे, जागृत भाव ठेवून
इजा न होईल इतर जनाना, हे लक्षात घेवून…७
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply