२० जानेवारी १९८० रोजी मद्रास क्रिकेट क्लब ग्राऊंडवर भारत-पाक कसोटी मालिकेतील पाचवा सामना संपला आणि या सामन्यातील विजयासह भारताने सहा सामन्यांच्या मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली. त्याआधीच्या तब्बल सत्तावीस वर्षांमध्ये भारताला पाकिस्तानविरुद्ध कसोटी मालिकांमध्ये विजय मिळविता आलेला नव्हता.
संक्षिप्त धावफलक : पाकिस्तान पहिला डाव २७२
(कपिलदेव ४-९०, करसन घावरी ३-७३). भारत पहिला डाव ४३० (गावसकर सुमारे दहा तासांमध्ये १६६ धावा, कपिलदेव सुमारे अडीच तासांमध्ये ८४ धावा.) पाकिस्तान दुसरा डाव २३३ (कपिलदेव ७-५६).संदीप पाटीलने या सामन्याद्वारे कसोटीजगतात प्रवेश केला होता.
भारत-पाकिस्तान कसोटी मालिका१९५२ : पाकिस्तान भारतात. भारत ५ सामन्यांच्या मालिकेत २-१ ने विजयी.१९५५ : भारत पाकिस्तानात. ५ सामन्यांची मालिका अनिर्णित.१९६० : पाकिस्तान भारतात. ५ सामन्यांची मालिका अनिर्णित.१९७८ : भारत पाकिस्तानात. भारत ३ सामन्यांच्या मालिकेत ०-२ ने पराभूत.१९७९ : पाकिस्तान भारतात. भारत ६ सामन्यांच्या मालिकेत २-० ने विजयी. (उपरोल्लेखित)१९८२ : भारत पाकिस्तानात. भारत ६ सामन्यांच्या मालिकेत ०-३ ने पराभूत.१९८३ : पाकिस्तान भारतात. ३ सामन्यांची मालिका अनिर्णित.१९८४ : भारत पाकिस्तानात. २ सामन्यांची मालिका अनिर्णित.१९८७ : पाकिस्तान भारतात. ५ सामन्यांच्या मालिकेत भारत ०-१ ने पराभूत.१९८९ : भारत पाकिस्तानात. ४ सामन्यांची मालिका अनिर्णित. (तेंडुलकरचे पदार्पण)१९९९ : पाकिस्तान भारतात. २ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी.२००४ : भारत पाकिस्तानात. ३ सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने विजयी.२००५ : पाकिस्तान भारतात. ३ सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी.२००६ : भारत पाकिस्तानात. ३ सामन्यांच्या मालिकेत भारत ०-१ ने पराभूत.२००७ : पाकिस्तान भारतात. ३ सामन्यांच्या मालिकेत भारत १-० ने विजयी.
आजवर झालेल्या एकूण ५९ भारत-पाक कसोट्यांपैकी १२ पाकिस्तानने जिंकलेल्या आहेत तर ९ भारताने जिंकलेल्या आहेत. नऊ विजयांपैकी केवळ दोन विजय पाकिस्तानी भूमीवर भारताला मिळविता आलेले आहेत. याउलट बारा विजयांपैकी तब्बल पाच विजय पाकिस्तानने भारतीय भूमीवर मिळविलेले आहेत.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply