जशा संध्याछाया येती, नयन माझे भिजतात ,
आठवणींचे माणिक-मोती,
सर सर खाली ओघळतात,–!!!
हात तुझा धरुनी हाती,
प्रेमाची केली वाटचाल,
नियतीने पण चाल खेळली, प्रितीची दुधारी वाट,–!!!
निळ्याशार गहिऱ्या लोचनी, वाचली प्रीतीचीच *आंण,–
तनामनात सामावून गेली,
तव ओढीला नच वाण,–!!!
आज कितीदा स्मरली,
प्रीत फुले ती सुगंधी,
परस्परांवर सारी उधळत,
करायचो रे नजरबंदी,–!!!
वाद अबोल्यांच्या त्या क्षणी, तरुणपणाचा सगळा जोश,
शब्द जरी कठोर बोलती,
श्वासात गुंतले सदा श्वास,–!!!
ऋतू सारे सारखे बदलती,
स्मरण यात्रेचा काळ लोटत,
इकडून तिकडे वारे वाहती,
त्यात आठवांचे ओले साद,–!!
किती काळ पुढे जाई,
अजूनही उभे तिथेच आपण,
पाणी पुलाखालून जाई,
हृदयी तरी आठवणी धरून,–!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply