जटामांसीचे सरळ वाढणारे ०.५-१ मी उंचीचे बहुवर्षायू क्षुप असते.ह्याचे मुळ १०-१२० सेंमी लांब असून त्यावर जटाकार केस असतात.ह्याची पाने मुलीय व काण्डीय असतात.फुले गुलाबी वा निळ्या रंगाची गुच्छात उगवतात.फळ ०.४ सेंमी लांब असून पांढरी लव असलेले असते.मुळांवरील पाने वाळून पडतात व त्यावर शिल्लक असणारे बळकट,तांबूस तपकिरी रंगाचे केस युक्त गाठी रहातात ज्यांना जटा म्हणतात.
जटामांसीचे गुणधर्म आता आपण जाणून घेऊयात:
हि चवीला कडू,तुरट,गोड असून थंड गुणाची व हल्की,स्निग्ध असते.हि प्रभावाने मानसदोष कमी करते.
आता आपण जटामांसीचे काही औषधी उपयोग जाणून घेऊयात:
१)जटामांसी थंड असल्याने पाण्यात वाटून हिचा लेप लावल्यास दाह कमी होतो.
२)घामाच्या दुर्गंधीमध्ये जटामांसीचा लेप शरीरावर करावा.
३)जटामांसी चवीला तुरट व थंड असल्याने केसांची मुळे बळकट करते तसेच सुगंधी असल्याने केश्य म्हणून तेलात वापरतात.
४)जटामांसी निद्राजनन असल्याने झोपेच्या तक्रारींवर उपयुक्त आहे.
५)जटामांसी चवीला कडू व हल्की असल्याने गर्भाशय शुद्ध करते व मासिक पाळी नियमीत करते.
(सुचना: ह्या लेखातील वनस्पती वैद्यांचा सल्ला घेऊनच वापरावे )
(कृपया फोटो चुकला असल्यास सांगावे हि विनंती)
वैद्य(सौ)स्वाती हेमंत अणवेकर
आरोग्य आयुर्वेदीक क्लिनीक,
म्हापसा गोवा.
संपर्क:९९६०६९९७०४
Leave a Reply