जयललिता यांच्या मृत्यू नंतर पुन्हा एकदा भारतीय चेह-या वरचा मुलामा उडाला आहे.जयललिता या ब्राह्मण विरोधी राजकीय पक्षाच्या सर्वेसर्वा होत्या . किंबहुना ब्राह्मण विरोध हाच या पक्षाचा इतिहास आहे. चेन्नईतील उच्च जातीचे लोक केव्हाच हद्दपार झाले आहेत . देशाचा इतर भागात राहून हि मंडळी नाकाने कांदे सोलत असतात . पण त्यांना त्याच्या राज्यात कुणी विचारात नाहीत हेच सत्य आहे.जयललिता यांच्या मृत्यू नंतर त्यांच्या नातेवाईक मंडळींनी मात्र त्यांच्या दफन विधी वर प्रश्न उभे केले आहेत.जयललिता यांचे दफन करण्याचे कारण काय हाच त्यांचा प्रश्न जयललितेच्या पक्षाला आहे.
माझी बहीण हिंदू होती ना ? असा सवाल जयललिता यांच्या भावाने उपस्थित करून पुन्हा एका जयललिता यांच्या प्रतीकात्मक बाहुलीचे दहन जयललिता यांच्या कुटुंबियांच्या समवेत करण्यात आले आणि हिंदू पद्धतीने सर्व अंत्यविधी पुन्हा करण्यात आले.पराकोटीचा हिंदू मत्सर असलेल्या पक्षाला जयललिता यांच्या कुटुंबीयांनी रोख ठोक सवाल उभे करून त्यांच्या मनमानीला एक प्रकारे आव्हान दिले आहे.
जयललिता यांचे व्यक्तिमत्व अत्यंत वादग्रस्त आणि आत्मकेंद्रित असे होते.त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात गरिबांची संपत्ती लुटल्याचे आरोप होते.प्रचंड संपत्ती बाळगून असलेली हि महिला मात्र तामिळनाडू मध्ये गरिबांची कैवारी म्हणून प्रसिद्ध होती.
तामिळनाडू मधील जयललिता आणि बंगाल मधील ममता यांच्या सारख्या नेत्यांमुळे त्याचे प्रदेश सर्व बाबतीत मागास वर्गीय ठरले आहेत. अत्यंत हुशार आणि ज्यांचा राज्यासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो असे लोक इतर राज्यात किंवा परदेशात परागंदा झाले आहेत.मुंबई ,पुणे नाशिक सारख्या ठिकाणी बंगाली आणि मद्रासी ब्राहमण लोकांचे वाढलेले प्रमाण यास साक्षीदार आहे.
ब्राहमण वादाला नष्ट करणारी पराकोटीची नास्तिकता हेच द्रविड लोकांचे मूळ तत्व झाले आहे.तामिळ नाडू मध्ये आर्य आणि द्रविड यांच्यातील लढा हा शेकडो वर्षाचा आहे.काही ठिकाणी द्रविडांवर उच्च वर्णीय आर्यांनी अत्याचार केले होते हे सुद्धा तितकेच खरे आहे.हा वाद सहजा सहजी सुटणार नाही.भारतातील सर्व नागरिकांना समान वागणूक हवी हे तत्व देशातील प्रत्येक भागात स्वीकारली पाहिजे.
बिहार ओरिसा उत्तर प्रदेश हि राज्ये सुद्धा दलित सवर्ण वादामुळे मागे पडली आहेत.जातीवर आधारित राजकारण हेच त्यांच्या मागासलेपणाचे मूळ कारण आहे. त्यामानाने महाराष्ट्राला महात्मा जोतिबा फुले , करवीरचे शाहू महाराज,प्रबोधनकार ठाकरे ,बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची बैठक आहे. म्हणून महाराष्ट्र प्रगत आहे.
इतर राज्यातील जाती धर्मावर आधारित राजकारणाचे लोण महाराष्ट्रात पसरणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. यातच महाराष्ट्राचे वेगळेपण दिसून येईल.
चिंतामणी कारखानीस
16 Dec 2016
Leave a Reply