जीव गुंतला रे जीव गुंतला
चांदण्यात या चंद्र ही बहरला,
गुंतून गेल्या रे अधर जाणिवा
तारका लाजल्या आकाशी पुन्हा..
जीव गुंतला रे जीव गुंतला
धुंद झाल्या रे मलमली भावना,
आस लागली शांत सरितेला
ओढ लागली सागर भेटीला..
जीव गुंतला रे जीव गुंतला
आठवणीत तुझ्या मोगरा फुलला,
अलवार मिठीत तुझ्या स्पर्श बावरा
प्रहर थांबेल तू मला ओढून घेता..
जीव गुंतला रे जीव गुंतला
पाकळ्या दव भरल्या पहाट वेळी अशा,
खुलवेल चांद प्रीत ओढ तुझी खुणावे पुन्हा
हात हातात तुझा चांदणे ओंजळीत जमा..
जीव गुंतला रे जीव गुंतला
गोड मोह तुझा काहूर माझ्या मना,
तन मन चेतले हलकेच लाजता,
चांद मातला तारागंणी पुन्हा..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply