जीवन आहे एक कल्पतरु
मिळेल ते, जे विचार करुं
ही आहे सुवर्ण माती
उगवेल ते, जसे पेरती ।।१।।
राग लोभ अहंकार
मोठेपण भासविणार
दाखवूनी क्षणिक सुख
देई पर्वतमय दुःख ।।२।।
दया क्षमा शांति
उच्च भावना असती
बिंबता हे सद् गुण
लाभेल खरे समाधान ।।३।।
घाणीच्या राशी पडती
निराशा व दुःखची वसती
स्वच्छता व निर्मळ घर
तेच सर्व सुखांचे माहेर ।।४।।
आपला आपण चालक
कर्म फळाचा मालक
सुख दुःखे येती
तेचि आपली निर्मिती ।।५।।
प्रयत्न सारे तुमचे हातीं
श्रद्धा ठेवावी ईश्वरावरती
योग्य करितां प्रयत्न
यशाचे मिळेल रत्न ।।६।।
जेथे प्रसन्न वातावरण
तेथे ईश्वरी आधिष्ठान
समजावे देवूनी लक्ष्य
जीवन आहे एक कल्पवृक्ष ।।७।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
Leave a Reply