नवीन लेखन...

जीवन आनंद

ह्या जीवनाच्या अस्तित्वाचे,  ध्येय कोणते खरे  ।
उत्तर याचे कुणा मिळेना, आज पावतो बरे  ।।

संतसाधू आणि ज्ञानीजन,  बहूत ते झाले  ।
समाधानी परि एक मताचे,  उत्तर नाही दिले  ।।

खेळखेळणे उड्या मारणे,  अन् खाणे पिणे  ।
बालपणीच्या आनंदाला,  नव्हते काही उणे  ।।

विसरून जाता खेळ उड्या अन् , प्रेम करू लागलो  ।
यौवनाच्या उंबरठ्यावरी,  बहरून गेलो  ।।

संसार करिता कळले आम्हा,  जीवन दुजासाठी  ।
प्रौढवयाची वर्षे घालविली,  समाज सेवेपोटी  ।।

वृद्धत्वाचा काळ येता,  ओढ लाभली प्रभूची  ।
आहिक सुख त्याग करुनी,  जीवन मुक्तीची  ।।

एक एक ती पायरी चढलो,  जीवन शिडीवरी  ।
शोधीत होतो ‘आनंद’ तेथे, मिळेल काहीतरी  ।।

हर घडीला रूप निराळे,  होते आनंदाचे  ।
गुंतले होते संबंध तेथे,  तन मनाचे  ।।

ओढ प्रभूची लागली,  जेंव्हां थकूनी गेला देह  ।
संसारातील सर्व सुखाचा,  निघून गेला मोह  ।।

मृत्यूच्या जवळी जाता, विरून जाईल तमनम  ।
कोठून आला कोठे गेला,  याची न येई जाण  ।।

आता त्याचा आनंद कोठे,  असेल तो गुंतला  ।
देहमनाचे वेष्टन नव्हते,  ज्या घटकेला  ।।

हा तर आहे केवळ ‘आनंद’ दुजा नसे काही  ।
‘आत्मा’ ‘मुक्ती’ अशा परि यालाच नावे देई  ।।

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..