नवीन लेखन...

जीवन चक्र

Jeevan Chakra

अमेरिकेमध्ये मिनियापोलीस ह्या शहरांत कांही काळ राहण्याचा योग आला होता. मुलगा तेथे नोकरीला होता. प्रशस्त बंगलावजा घर. सर्व कॉलनितली घरे स्वतंत्र. सर्व सभोवताल निसर्ग रम्य केलेला. बाग फुलझाडे, गवताचे गालिचे, सर्वत्र हिरवळ, झोपाळा, मुलांना खेळण्याची सोय, विखुरलेले पाण्याचे नळ. तेथे जे सर्व सामान्य नागरिकाला सहजपणे उपभोगता येते, तसे भारतात गर्भ श्रीमंतांना उपभोगता येत नसल्याचे जाणवले. कारण तेथे जागा, हवा पाणी उर्जा( वीज ) फळे फुले धान्य, आणि सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोई भरपूर. सर्वाना आणि सहज उपलब्ध असलेल्या दिसतात. विकासाचा मूळ ढाचा मजबूत आणि मुबलक . स्वच्छता आणि प्रशस्त रस्ते व वाहने मनास आनंदित करतात.

एक गम्मत आठवली. मी भारतातून तेथे जाताना, सवई प्रमाणे मच्छरदानी नेली होती. डासा मुळे शांत झोपेला अडचण भासू नये म्हणून मच्छरदानीत झोपण्याची सवय. मुलगा ते बघून हसला. ” बाबा इथे घरांत एक मच्छर मला दाखवा मी त्याबद्दल एक डॉलर देईन. “ गमतीने तो म्हणाला. डास बाहेर असतील परंतु घरांत डास, माश्या, झुरळ, कोळी, ( Spider ) इत्यादी केंव्हाच सापडत नाहीत. दारे खिडक्या सतत बंद ठेवण्याची काळजी घेतली जाते. सर्व घर Air-Condition ने सतत समशीतोष्ण व हवेशीर ठेवले जाते. परिस्थिती व वातावरणाचे कौतुक वाटले.
एक दिवस अचानक छताच्या कोपऱ्यावर, एका कोळ्याने जाळे विनून तो मध्यभागी असल्याचे दिसले. कदाचित तो बाहेरून घरांत शिरला असेल. आपल्या जगण्यासाठी खाण्या व राहण्यासाठी ही त्याची योजना असेल. हा एक निसर्ग होता. मला आश्चर्य वाटले ते याचे की त्याला खाद्य कसे मिळणार? स्वछतेच्या कल्पनेखाली बाह्य वातावरणाचा घरामधील संपर्क नव्हता. डास, माश्या, कीटक हेच त्याचे खाद्य. परंतु ते मिळण्याची शक्यताच नव्हती. मुलगा परप्रांतात आला तेंव्हा त्याला निसर्गाची चेतना व प्रयत्न ह्यांनी जगण्याचे मार्ग दाखवून दिले. Struggle for existance हा तर जीवन जगण्याचा ईश्वरी मंत्र असतो. तो निसर्ग प्रत्येकाला देतो. कितेकजण बर्फाछादित प्रदेशांत, घनदाट जंगलात, विरळ हवामान असलेल्या उंच पर्वतावर, सतत पावसाचा मारा असलेल्या भागात , दलदल प्रदेशात, ज्या ठिकाणी लाव्हा सतत जमिनीतून उफाळून बाहेर पडतो तेथे, जो भाग भूकंपाचे धक्के जाणवतो, त्या भागात, इत्यादी मध्ये मानवी वस्ती करून राह्तोच की.
सर्व सामान्यांना जगण्यासाठी वातावरण तेथे नसते. तरीही लोकवस्ती करून जीवन चक्रामधल्या नैसर्गिक गरजा पूर्ण करीत समाधान व आनंदाने जगतात. प्रत्येकाच्या जीवन जगण्याच्या गरजा सर्व सारख्याच असतात. त्यावर तो जगतो. संकल्पना व सोई भिन्न भिन्न असू शकतात.
त्या कोळ्याने जगण्या खाण्यासाठी बांधलेले घर ही त्याची गरज होती, सोय नव्हे.निसर्ग व त्याची चेतना ह्याचा परिणाम म्हणजे त्या कोळ्याच्या ( Spider च्या) चेतनेला निसर्गाची साथ असल्यामुळे विचित्र परिस्थितीत देखील तो आपले जीवन चक्र जगेल.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..