जीवन झेप कुठे घेईल,
याची मला हुरहूर आहे……
चार पैशाच्या कर्जापायी,
गाव रान्हं सोडलं आहे…..
गावात शेत छान माझ्या,
पण पैशाची कमी आहे…..
चार पैशाच्या कर्जानं ,
जीवन ओझं झालं आहे…..
स्वार्थाच्या मोही जगात,
सर्वच मला अनोळखी आहे…..
मी फक्त – स्तब्ध,
जग पुढं चाललं आहे…..
पैशाच्या आतुरतेचा,
माणूस गुलाम बनला आहे…..
गरीबाच्या शब्दांना – – जगात..,
मोल फार कमी आहे …..
म्हणूनच.. – – जीवन कुठे झेप घेईल,
याचीच मला हुरहूर आहे…. .
— गजानन साताप्पा मोहिते