त्याची ऐकूनी करूण कहाणी, डोळे भरून आले पाणी
हृदय येता उंचबळूनी, निराश झाले मन ।।१।।
आघात होता त्याच्या जीवनी, तो तर नव्हता माझा कुणी
तरी का आले प्रेम दाटूनी, उमजेना काही ।।२।।
दु:ख दुजाचे समोर आले, मनास ज्याने कंपीत केले
दोन जीवांच्या हृदयामधले, अदृष्य हे धागे ।।३।।
मानव धर्म एक बिजाचा, वाढत गेला गुंता त्याचा
ओढत असता धागा टोकाचा, दुजा हळहळतो ।।४।।
राग लोभ वा प्रेम भावना, बांधूनी ठेवते एकमेकाना
हिच असे निसर्ग योजना, जीवन म्हणती याला ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५९
Leave a Reply