जीवन काय आहे,
मला जे वाटत असे,
ते समजून घ्या तुम्हीं,
प्रभूमय ते कसे ।।१।।
मृत्यूचा तो विचार,
कधी न येई मनी,
मृत्यू आहे निश्चित,
माहित हे असूनी ।।२।।
भीती आम्हां देहाची,
कारण ते नाशवंत,
न वाटे मरूत आम्ही,
आत्मा असूनी भगवंत ।।३।।
आत्मा आहेची अमर,
मरणाची नसे भीती,
जी भीती वाटते,
ती असते देहाची ।।४।।
आत्मा नसे कुणी,
तो तर प्रभूच आहे,
साकारलेला सर्वत्र,
बाहेर व अंतरी राहे ।।५।।
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply