नवीन लेखन...

मुंबईकरांचे “जीवन”समस्या कारणे व उपाय

मुंबईकरांचे “जीवन” समस्या कारणे व उपाय

म.गांधीजींना अपेक्षित असलेल्या कृषी क्षेत्राकडे सरकारने हवेतसे लक्ष न दिल्याने खेडेगावातील जनता धंदा व्यवसाय निमित्त मोठ्या शहरांत स्थलांतरित होताना दिसतात. आज मुंबईतच बघाना, नागरिकांच्या निवार्याचा प्रश्न सोडवताना जुन्या इमारतींचे रुपांतर उंचच उंच टावरमध्ये होताना बघतो (राजकारणी, बिल्डर व डेव्हलपर्स आपले उखळ पांढरे करून घेत आहेत) पण दुसर्या बाजूला इतर मुलभूत गरजांकडे दुर्लक्ष होताना दिसते. मुंबईतील नागरिकांचे वृक्ष व कोरडे जीवन ओले करण्यासाठी अमूल्य अश्या जलरूपी “जीवांना”ची अत्यंत आवश्यकता आहे.

आज आपण पहातो निसर्गाच्या लहरीपणामुळे (अर्थात याला आपणच जबाबदार आहोत) पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसागणिक बिकट होत चालला आहे. मुंबई शहराला मिळणारे पाणी १०० कि.मी.पेक्षा लांब असलेल्या तलावातून मुंबईत आणले जाते. त्यावर विविध प्रक्रिया करून ते पिण्यायोग्य केले जाते आणि यासाठी खूप खर्चही होतो. तरीही मुंबई महापालिका आपल्याला ते स्वस्त दारात उपलब्ध करते याची जाणीव आपल्या पैकी फारच थोडया जणांना असेल.

प्रवासात तहान लागल्यास आपण अर्धा किंवा एक लिटरच्या पाण्याच्या बाटल्या १२ ते १५ किंवा जास्त रुपयांना विकत घेतो. पण आज मुंबईत संडास/बाथरूमसाठी व इतर कामासाठी कित्येक लिटर पिण्याचे शुद्धपाणी वापरले जाते. बरेच पाणी या ना त्या कारणाने फुकट जाते. मुंबईतील काही रहिवासी निष्काळजीपणे पाण्याच्या बदल्या वाहात ठेवताना आपल्या नजरेस येतात. झोपडपट्टीतील काही नागरिक पाईपला भोके पाडून त्यातून पाण्याचा वापर करताना बघतो. पाण्याची चोरी व फुकट घालवणे हे थांबल्यास पुरवठ्यात बराच फरक पडेल. आणि मुख्य म्हणजे पिण्याचे पाणी मुंबईतील सर्व रहिवाश्यांना कधीही कमी पडणार नाही. मुंबईत मिळणारे पाणी भारतातील इतर कुठल्याही शहरात अभावानेच मिळेत असेल. वरील सर्व मुद्दे विचारात घेता काही उपाय व सूचना कराव्याश्या वाटतात त्या पुढील प्रमाणे :-

1) मुंबईत पिण्याच्या पाण्याचे नियोजन योग्य रीतीने करूनच सदनिका बांधण्याचा परवाना देण्यात यावा.

२) मुंबईत महापालिकेने सदनिका बांधण्याचा परवाना देताना प्रत्येक बिल्डर व डेव्हलपर्सना बोरवेल खोदण्यास अनिवार्य केलेच आहे त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात यावी.

३) बोरावेल्चे पाणी बागा, रत्यावरील व सोसायट्यानच्या मधील झाडांसाठी आणि संडास/बाथरूमसाठी वापरावे.

४) पाण्याची चोरी करणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यात यावी.

५) पाणी गळती त्वरेने थांबविण्याचा पालिकेने प्रयास करावा.

६) शक्य असेल तेथे पावसाचे पाणी साठवून वापरल्यास निदान पावसाळ्याचे चार महिने तरी पिण्याच्या पाण्याची बचत होईल.

७) मुंबईतील वापरत नसलेल्या विहिरी व तलाव साफ करून तसेच त्या पाण्याची टेस्ट पालिकेच्या ल्याबमध्ये करून ते पाणी वापरत आणावे.

तरी वरील सर्व मुद्यांचा विचार मुंबईतील नागरिक, पालिका व शासन गांभीर्याने करतील अशी अशा

आहे.

जगदीश पटवर्धन वझिरा, बोरीवली (प)

आपल्या अमर्याद वाढत्या लोकसंख्येला मुलभूत गरजा भागवताना पालिका व शासन मेटाकुटीस आले आहे, तसेच आपण सर्वांनी निसर्गर कुरघोडी केल्याने निसर्गराजा रागावला आहे. कुठे पाउस जास्त, कुठे थंडी तर कुठे बर्फ फाडतो. या ग्लोबलवार्मिंगचे परिणाम आपल्या सर्वांना भोगावे लागत आहेत. ते थांबण्यासाठी व पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी काही प्रयत्न !

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..