ऊन सावली जीवन हे रे
जसे मिळाले तसे जगावे
आनंदाची फुले होऊनी
दुःखाला सामोरे जावे ……… १
कुणास देणे नक्षत्रांचे
हात कुणाचे रिते राहिले
दैवाने हे हिशेब सगळे
त्या त्या खाती लिहिलेले ……. २
पान उद्याचे उद्या उलगडू
आज तयाचे कशास ओझे l
काल-आज जे लिहिले-पुसले
त्यात काय रे होते माझे?……. ३
……मी मानसी
Thanks for cooperation…
पण उद्याचे उद्या उलगडू नसून.. पान उद्याचे उद्या उलगडू असे आहे…बदल केल्यास आभार!
done