अभिनेत्री व शशि कपूर यांची पत्नी जेनिफर केंडल यांचा जन्म दि. २८ फेब्रुवारी १९३४ साउथपोर्ट यूके येथे झाला.
जेनिफर यांचे वडील गोफरे केंडल जेष्ठ रंगकर्मी होते. ते आपली पत्नी व दोन्ही मुलीच्या सोबत कोलकाता येथे शेक्सपियरन ग्रुप चालवत असत. जेनिफर यांची बहीण फ्री केंडल यांनी ‘शेक्सपीयर वाला’ या ऑटोबायोग्राफीमध्ये सांगितलं की, शशी आणि जेनिफर यांची पहिली ओळख एका कनफ्यूजनमुळे झाली होती. कोलकाताच्या एंपायर हाऊसनं जेफ्री यांच्या ‘शेक्सपीयराना’ आणि शशी कपूर यांच्या ‘पृथ्वी थिएटर्स’ यांना परफॉर्मन्सला एकच तारीख दिली होती. या अनोख्या लव्ह स्टोरीचा एक पैलू जेनिफर यांच्या वडिलांनीही उघड केला होता. या गोंधळानंतर असं ठरलं की, दोन्ही ग्रुप एक दिवस सोडून एक दिवस असं परफॉर्म करतील ज्यामुळे दोघांनाही पुरेसा वेळ मिळेल. पहिल्या दिवशी बॅकस्टेजला झालेल्या ओळखी नंतर १८ वर्षांचे शशी कपूर २३ वर्षांच्या जेनिफर यांच्या प्रेमात पडले. ही लव्ह स्टोरी सुरु झाल्यावर यात समस्या यायला सुरुवात झाली. ८० च्या दशकातील सिनेमांच्या टिपिकल लव्ह स्टोरी प्रमाणे या दोघांच्याही प्रेमाचा प्रवास सोपा नव्हता. जेनिफर यांच्या वडिलांनी आपल्या नाटकाच्या ग्रुपमध्ये शशी कपूर यांना घेतलं होतं. मात्र ते जेनिफर आणि शशी यांच्या प्रेमाच्या विरोधात होते. शशी यांच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीवरुन जेफ्री अनेकदा त्यांची थट्टा करत आणि यामुळे अनेकदा जेफ्री आणि जेनिफर यांच्यात भांडण होत असे.
शशी आणि जेनिफर यांनी मिळून जेफ्री यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण त्यात ते यशस्वी झाले नाहीत. बराच काळ प्रयत्न केल्यानंतर शशी आणि जेनिफर यांनी शेक्शपीयराना ग्रुप सोडला. विदेशातील त्यांचे शो रद्द होऊ लागल्यावर शशी कपूर यांनी मोठा भाऊ राज कपूर यांच्याकडे मदत मागितली. भावाने मदत मागितल्यावर राज कपूर यांनी मुंबईच्या विमानाची दोन तिकीटं पाठवली. शशी आणि जेनिफर मुंबईला परतल्यावर कपूर कुटुंबीयांनी या दोघांचं लग्न लावून दिलं.
१९८१ साली आलेल्या ३६ चौरंगी लेन या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बाफ्टा पुरस्कार जेनिफर यांना मिळाला होता. त्यांचे इतर चित्रपट बॉम्बे टॉकी (1970), जूनून (1978), हीट एंड डस्ट (1983) व घरे बायर (1984) हे होते. शशी व जेनिफर यांना तीन मुलं आहेत. करण, कुणाल आणि संजना मात्र या तिघांपैकी कोणीही अभिनय क्षेत्रात नाहीत. जेनिफर केंडल यांचे निधन ७ सप्टेंबर १९८४ रोजी झाले.
https://www.youtube.com/watch?v=IcgNcxmISy0
संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
Leave a Reply