अर्ध्या तासापुर्वी माझ्या गर्लफ्रेंडचा कॉल आलेला… अगदि ऒक्साबोक्शी रडत होती… वाटलं सासू गचकली , ईतका सिरियस मॅटर…… विचारावं तर भोकाड जोरात सुरू होणार… तरी आंजारून गोंजारून विचारलच… पर्यायही नव्हता… विचारलं
अरे बाबा काय झालं?
तर म्हणे आईशी वाद झालाय..
“म्हणजे अंदाज बरोबर”
कारण काय तर उद्या 31 मार्च jioरिचार्ज करायचय … आणि आईऩे करायचा नाही अस सांगितलय… मग भांडण तिच्याशी…. मांडवली पण झाली …. काय तर watsappp अनइन्सटॉल…
मग आत्ता बोलायचं कस?
मला हसुच आवरेना… तरी विचारलं
फक्त watsapp च ना? ठसक्यात ऊत्तर आलं.. “हो”.
मग माझ्यातला पिवर मालवणी जागा झाला… म्हणाला…
” गो पोरा.. मेंसेंजर , हाईक आसा ना मग रडतस कित्याक…? एक मालवणी म्हण सांगतय ती आयक…
” जेनी चड्डी शिवल्यान तेनी मुताक वाट नक्की ठेवल्यान”.
बापूर्झा
डॉ. बापू भोगटे…
Leave a Reply