झाकोळले सारे गगन आता
विसावला क्षितिजी भास्कर
मेघडंबरी,रंगरंगले भावतरंग
स्पंदनी,आठवांचा गंध आता ।।१।।
किती, किती काय ते स्मरावे
व्याकुळ! हॄदयांतरीचे उसासे
शब्दशब्द सारे जाहले मलूल
प्रीतभावही, कोमेजले आता ।।२।।
उदय! अस्त! साक्ष चिरंजीवी
सत्यता! उमलणे अन मुरझणे
कालचक्र हे, दिगंतरी अविरत
ऋणानुबंधही, मृगजळ आता ।।३।।
जीवन सारेच दान हे संचिताचे
कर्मभोग सारे, योग प्रारब्धाचे
भगवंताच्या हाती, जीवन सारे
व्हावे कृपावंत! त्यानेच आता ।।४।।
नीलांबरी उभा, निळासावळा
खुणावते आता ती धुन वेणुची
आज तृप्त, तृप्त जाहली गात्रे
व्हावे! समाधिस्त जीवन आता।।५।।
© वि.ग.सातपुते.(भावकवी)
मोबाईल: 9766544908
रचना क्र. ९१.
१३ – ७ – २०१९.
Leave a Reply