नवीन लेखन...

विकिपीडिया चे सहसंस्थापक व प्रमुख जिमी वेल्स

आज इंटरनेटवरील सर्वात महत्त्वाची संकेतस्थळे कोणती, असे जागतिक सर्वेक्षण कोणी केलेच, तर त्यात विकिपीडियाचे नाव नक्कीच पहिल्या दहा संकेतस्थळांत असेल. त्यांचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल येथे झाला.

जिमी वेल्स हे मूळचे अमेरिकन. त्यांचे वडील एका वाणसामानाच्या दुकानाचे व्यवस्थापक होते. एका खासगी शाळेत ते शिकले. तेथेच त्यांना विश्वकोश वाचण्याचा छंद जडला. विकिपीडिया निर्मितीची प्रेरणा त्यातच कुठे तरी असावी. या शिवाय लहानपणापासूनच त्यांना संगणकाची ओढ होती. तासन् तास संगणकावर खेळ खेळणे, कॉम्प्युटर कोड तयार करणे हा त्यांचा आवडता उद्योग होता. त्यातूनच त्यांना या माध्यमाची महती लक्षात आली. पुढे त्यांनी अर्थशास्त्रात पीएच.डी. संपादन केली.

अलाबामा आणि इंडियाना विद्यापीठात काही काळ प्राध्यापकीही केली. १९९६ मध्ये मात्र त्यांनी संगणक क्षेत्रातच करिअर करण्याचा निर्णय घेतला आणि दोन सहकाऱ्यांसह बोमीस हे वेबपोर्टल तयार केले. ते अश्लील मजकुराचे, छायाचित्रांचे पोर्टल होते. पण त्याचेही एक वैशिष्टय़ म्हणजे त्यावर सर्वसामान्य संगणक वापरकर्ता आपली छायाचित्रे अपलोड करू शकत असत. मात्र त्यांचा तो प्रयोग सपशेल फसला आणि जिमी वेल्स ऑनलाइन विश्वकोश निर्मितीकडे वळले. २००० साली त्यांनी ‘नूपीडिया’ हा ऑनलाइन विश्वकोश सुरू केला. तत्पूर्वी त्यांची लॅरी सँगर या तत्त्वज्ञानाच्या विद्यार्थ्यांशी ओळख झाली होती. १९९०च्या सुमारास वेल्स एक ऑनलाइन ग्रुप चालवत होते. त्यात आयन रँड या तत्त्ववेत्त्या लेखिकेच्या ऑब्जेक्टिव्हिजम या तत्त्वज्ञानाची चर्चा होत असे. त्यातूनच त्यांचा सँगर यांच्याशी परिचय झाला होता. या दोघांनी मिळून नूपीडिया चालवताना येत असलेल्या अडचणींचा वेध घेऊन, त्यात सुधारणा करून, १५ जानेवारी २००१ रोजी लॅरी सॅंगर ह्यांच्या सोबतीने ‘विकिपीडिया’ हे संकेतस्थळ सुरू केले.

विकिपीडिया हे साईटचं विकी हे नाव एका सर्वर प्रोग्रॅममधून आलंय. विकी हा शब्द सुरवातीला एका कॉम्प्युटर प्रोग्रॅममधे वापरला गेला होता. १९९५ मधे वार्ड कॅनिंगहॅम यांच्यामुळे तो प्रचारात आला. त्यावेळेस ‘विकी विकी वेब डॉट विकी’ हे सॉफ्टवेअर तयार करण्यात आलं. लोकांनी आपणांस हव्या त्या विषयावरील माहिती या संकेतस्थळावर अपलोड करावी. उपलब्ध माहितीत भर घालावी, ती संपादित करावी, असे या संकेतस्थळाचे स्वरूप आहे. आज इंग्रजी विकिपीडियामध्ये असे सुमारे ४८ लाखाहून अधिक लेख आहेत. असे माहितीपूर्ण लेख एकाच ठिकाणी असणे ही काही साधी गोष्ट नाही. कसलीही माहिती हवी असेल तर आपल्याकडे आता एक सोप्पा मार्ग उपलब्ध झालाय. गुगलवर आपल्याला हव्या असलेल्या माहितीचा की वर्ड सर्च केला की पहिला पर्याय येतो तो विकिपीडियाचा. विकिपीडियावर सगळ्या गोष्टींची बेसिक पण डिटेल माहिती उपलब्ध असते.

आणि विशेष म्हणजे ही माहिती मोफत आणि सर्वांसाठी खुली असते. ही सगळी माहिती ‘ओपन सोर्स लायसन्स’प्रमाणे उपयोगात आणली जाते. त्यामुळेच विकिपीडियाला एनसायक्लोपीडिया म्हणजेच विश्वकोश म्हणतात. लोकांनी लोकांसाठी लोकांकडून चालविलेला विश्वकोश असे त्याबद्दल म्हणता येईल.

ही सगळी माहिती किती महत्त्वाची आहे याचा प्रत्यय तसा प्रत्येकालाच – एखाद्या विषयावर लेख लिहिताना, प्रोजेक्ट तयार करताना, निबंध लिहिताना, शाळेचा गृहपाठ करताना जेव्हा आपण विकिपीडियाकडे धाव घेतो तेव्हा – येत असतो!

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ :- इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..