जिमी वेल्स याचा जन्म ७ ऑगस्ट १९६६ रोजी वेल्स ह्यांचा जन्म अलाबामा राज्यातील हंट्सव्हिल शहरात मध्यरात्री झाला . म्हणून त्यांची जन्मतारीख त्यांच्या जन्मदाखल्यावर 8 ऑगस्ट ही आहे. लहानपणी त्याचे वाचन खूप होते , तो अत्यंत काळजीपूर्वक वाचन करत असे. त्याचे वडील एका ग्रोसरीच्या दुकानांमध्ये मॅनेजर होते तर त्याची आई एक खाजगी शाळा चालवत होती. शाळेत असताना त्याचा जास्तीत जास्त वेळ ब्रिटानिका वर्ल्ड बुक एनसायक्लोपेडिया वाचण्यात जात असे आणि तो तीन वर्षाचा असताना त्याच्या आईने त्याला वर्ल्ड बुक एनसायक्लोपेडिया आणून दिला . तो जसजसा मोठा होत गेला तसा तो जास्त वाचन करू लागला. पुढे त्याला कळू लागले की या एनसायक्लोपेडियामध्ये बऱ्याच त्रुटी आहेत. त्यांचे शिक्षण रेन्डोल्फ स्कूल मध्ये झाले खरे तर त्या शाळेचे शिक्षण महाग होते परंतु तेथे त्याला शिक्षणाची आवड लागली. त्यानंतर त्याचे पुढील शिक्षण अलाबामा विद्यापीठात झाले .तेथे त्याने वित्तशास्त्रात पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. पी. एच. डी . ची पदवी घेण्यापूर्वी ततो नोकरी करत होते. शिक्षण पुरे झाल्यावर त्याने एका वित्तकंपनीमध्ये नोकरी केली.
त्यानंतर त्याने १९९४ मध्ये शिकागो येथे रिसर्च डायरेक्टर म्हणून काम केले. बोमीस ह्या डॉट.कॉम कंपनीची स्थापना केली. नुपेडिया ही त्यांची कंपनीदेखील होती ती देखील माहिती पुरवत होती आणि त्याद्वारे ते फंडस् गोळा करत होते . ‘ नुपेडिया चा अर्थ फ्री सायक्लोपेडिया असा होता.
तो आणि त्याच्या मित्रांनी २००१ साली त्यांनी लॅरी सँगर आणि इतर ह्यांच्या सोबतीने विकिपीडियाची स्थापना केली. विकिपीडिया म्हणजे ओपन कन्टेन्ट एनसायक्लोपेडिया . त्याचा प्रसार आणि प्रचार वेगाने होऊ लागला. जिमी त्या प्रोजेक्टचा प्रमोटर आणि संवाददाता झाला. विकिपीडिया स्थापन झाल्यावर त्याने पहिला शब्द लिहिला ‘ हॅलो वर्ल्ड ‘ . पण त्याआधी त्याने नुपेडिया आणि विकिपीडिया साठी पैसा गोळा करण्यास सुरवात केली. सुरवातीचा पॆसा त्यांनी गोळा केला. विकिपीडियाची लोकप्रियता वाढू लागली, त्याचा पसाराही वाढू लागला.
लोकांना एका बटणाचा क्लीकवर हवी ती माहिती मिळू लागली. आज विकिपीडिया फाउंडेशन ही एक धर्मादाय संघटना आहे ही कोणताही लाभ न घेता विकिपीडिया चालू आहे. हळू हळू अनेक जण त्यावर लिहू लागले अनेक भाषांमधून लिहू लागले. जिमी वेल्स पुर्णपणे नास्तिक असून त्याचा भर माणसाच्या कर्तृत्वाचा आहे.
जिमी वेल्सला ही दंभ नाही किंवा गुर्मी नाही सहजपणे तो पाठीवर सॅक टाकून गर्दीत मिसळताना त्याला मी पाहिले आहे. आपण सहजपणे विचारलेल्या प्रश्नांना तो सहजपणे उत्तर देतो. इतका तो साधा आहे.
त्यानंतर काही दिवसात अनेक लेख विकिपीडियावर लिहिले गेले. भारतात हे लेख कोणीही लिहू शकते . ज्याला माहीत असते तो ती माहिती त्यात टाकू लागला आणि विकिपीडियाचा प्रसार आणि लोकप्रियता वाढू लागली. निरनिराळ्या विषयावर लिहिले जाऊ लागले . अर्थात ते लिहिताना एक धोका होता की तुम्ही जे लिहिता आहेत ते बरोबर आहे का , किंवा चुकिचे आहे का हे तुमचे तुम्हालाच तपासून बघावे लागते. जर चुकिचे लिहिले तर , दुसरा ते बरोबर करू शकत असे. सुरवातीला या माध्यमात चुकीची माहिती देखील दिली जात असे , कधीकधी माहिती अपुरीही असे . अनुभवाने ती शक्यताही कमी झाली अर्थात ह्यामुळे साधारण माणसाला चार गोष्टी कळतात हे महत्वाचे आहे हे विकिपीडियाचे खरे काम होते. परंतु हल्ली सहसा जास्त चुका विकिपीडिया होत नाही , त्यांच्या ग्रुपवरून काळजी घेतली जाते.
आज दुर्देवाने आपले जुने मराठी कलाकार, लेखक , कवी यांच्याबद्दल खरोखर माहिती मिळणे दुरापास्त आहे , त्यांचे जे कुटूंबीय किंवा दोन ते तीन पिढ्यानंतरचे जे कोणी जिवंत असतील त्यांना देखील पूर्ण माहिती नसते. अर्थात त्यांनी अशी माहिती मिळवून लिहून ठेवली तर निश्चित तो एक न मिटणार इतिहास ठरेल पण तसे होत नाही , सुदैवाने जिमी वेल्सने ते ओळखले आणि सगळ्यांसाठी विकिपिडियामार्फत एक इतिहास जिवंत ठेवला. हे खूप महत्वाचे काम आहे. आपल्या मराठी भाषेत कोश लिहिले जातात परंतु ते इंटरनेटवर आणणे गरजेचे आहे. ती माहिती फक्त जाड पुस्तकांमध्ये असते आणि ती ग्रंथालयाच्या कपाटामध्ये असतात. विकिपीडियासारख्या माध्यमातून ती सामान्य माणसापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. आज जिमी वेल्सच्या विकिपीडियाचे हजारो व्हॉलेंटिअर्स अनेक भाषांमधून काम जगभर काम करत आहेत.
जवळजवळ विकीपिडीयावर २ मिलियन लेख आहेत त्यामध्ये जर्मन , इंग्लिश , फ्रेंच आणि अनेक युरोपियन भाषांमधून आहे. जवळजवळ एक-त्रुतीय लोक इंग्रजीमधून माहिती बघतात. त्याने त्याच्या ‘ टेड ‘ मधील भाषणामध्ये सांगितले आणि ग्राफ दाखवला एक ग्राफ न्यूऑर्क टाइम्सचा होता आणि एक त्याच्या विकिपीडियाचा होता तो म्हणाला न्यूयॉर्क टाईम्समध्ये हे सर्व सांभाळण्यासाठी किती स्टाफ असेल माहीत नाही परंतु जिमी वेल्सच्या विकिपीडियामध्ये फक्त एकच स्टाफ होता तो म्हणजे सॉफ्ट वेअर डेव्हलपर . त्याचे सर्व काम व्हॉलेंटिअर्सच करतात. तीन ठिकाणी त्याची ९० सर्व्हर्स काम करत असतात. सर्व काम इंटरेनेटद्वारे ऑन लाईन होत असते. २४ तासात १.२४ बिलियन लोक माहिती मिळवतात.
जिमी वेल्सबद्दल खूप काही सांगता येईल , परंतु एका वाक्यात सांगायचे झाले तर त्याने संपूर्ण जगाला एक ‘ ज्ञानाची आणि माहितीची गुहा ‘ उघडून दिली आहे.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply