संध्याकाळी यामिनी ऑफिसमधून लवकर घरी आली तेंव्हा विजय घरी आलेला नव्हताच ! यामिनी घरी आल्या आल्या फ्रेश होऊन हॉलमध्ये टी.व्ही. पाहत बसलेली असताना दारावरची बेल वाचली चहाचा कप समोरच्या टेबलावर ठेऊन ती दरवाजा उघडायला उठली , दरवाज्यात प्रतिभा उभी होती तिला आत घेताच…
प्रतिभा : मॅडम आज लवकर आलात का ?
यामिनी : हो ! आज जरा लवकर सुटका झाली ! प्रतिभा ! मी चहा बनविला आहे तो तू घे ! आणि कामाला सुरुवात कर !
प्रतिभा : ठीक आहे मॅडम !
यामिनी : बर ! आज रात्रीसाठी पनीरची भाजी कर ! मी पनीर आणून ठेवलाय फ्रिजमध्ये ! यापूढे काही आणायचे असेल तर तूच येताना घेऊन येत जा… मी पैसे देऊन ठेवत जाईन तुला, मी विसरले तर साहेबांकडून घेत जा..
प्रतिभा : ठीक आहे …
म्हणत प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते… यामिनी तेथेच पुन्हां टी. व्ही. पाहण्यात गुंग होते, यामिनी इतकी शिकलेली तरी तिला सास – बहूच्या सीरिअल खूप आवडत असतात… कामाच्या व्यापामुळे तिला फार टी.व्ही. पाहायला मिळत नाही पण जेंव्हा कधी वेळ मिळतो तेंव्हा ती टी.व्ही. पाहते. इतक्यात पुन्हा दारावरची बेल वाजते यामिनी दरवाजा उघडते तर दरवाज्यात विजय उभा असतो ! तो आत येताच सोफ्यावर बसतो आणि…
विजय : प्रतिभा माझ्यासाठी जरा चहा घेऊन येतेस का ?
प्रतिभा : स्वयंपाकघरातूनच हो ! हो ! आले
विजय : यामिनी ! तू आज लवकर घरी आलीस ?
यामिनी : का ! मी लवकर आले याच तुला वाईट वाटते आहे का ?
विजय : मला का वाईट वाटेल ?
यामिनी :वाटणारच ना ! कारण मी लवकर आले कि तुला तुझी आवडती मालिका पाहायला मिळणार नाही ना ! मालिका कसल्या पाहतोस ! त्यातील नायिका पाहत असतोस डोळे फाडून…
विजय : विनोदाने .. हे बाकी बरोबर बोललीस, ” या मालिकेतील अभिनेत्रींनसमोर मला चित्रपटातील अभिनेत्री फिक्या वाटतात.. त्यात प्रत्येक नवीन मालिकेत नवीन अभिनेत्री येतच असते एकीच्या प्रेमात पडतो न पडतो तो दुसरी हजर ! त्यात व्हिलनच काम करणाऱ्या अभिनेत्री तर नायिकेपेक्षाही दिसायला सुंदर असतात..
यामिनी : बस ! आता त्याच्या सौंदर्याची स्तुती, मला सांग तू कोठे गेला होतास ?
विजय : मी ना ! बाहेर जरा पाय मोकळे करायला गेलो होतो… ढेरी थोडी कमी करावी म्हणतो…
यामिनी : ती आता कमी करून कोठे जायचंय ?
विजय : कोठे जयला कशाला पाहिजे ! पण वजन नियंत्रात ठेवलेले उत्तम , तुला सांगतो मी लहान असताना मला सर्वजण सुकड्या म्हणायचे, तेंव्हा त्याचा मला खूप राग यायचा पण आता लोक सुकड्याना सुकड्या नाही तर झिरो फिगर म्हणतात… आता मी झिरो फिगर राहिलो नाही याचे वाईट वाटते… पूर्वी कसा मी दहा फुटावरूनही उडी मारायचो पण आता चार फुटावरूनही मारता येणार नाही…
प्रतिभा : इतक्यात चहा नाश्ता घेऊन येते दोघांसाठीही… घ्या साहेब – मॅडम चहा आणि नाश्ता, नाश्त्यात कांदे – पोहे केले आहेत.
विजय : थँक यु ! प्रतिभा ! खरंच मला खूप भूक लागली होती..
यामिनी : पोहे खाता खाता .. विजय ह्या प्रतिभाला काहीच सांगावे लागत नाही, ती सारे अगदी घरच्या माणसांसाठी करतात तसेच करते…
विजय : आपल्यालाही ती घरच्यांसारखीच आहे… पोहे छान केले आहेत हा !
यामिनी : बरं ! हा घे रिमोट आणि तू तुझ्या नायिका बघत बस ! मी आत जाऊन प्रतिभाला स्वयंपाकात थोडी मदत करते.. आज लवकर आले आहे तर..
यामिनी प्रतिभाला मदत करायला स्वयंपाक घरात निघून जाते विजय तेथेच सोफ्यावर बसून चॅनेल बदलत राहतो…. त्याला एक चॅनेल दहा मिनिटापेक्षा जास्त वेळ पाहवत नाही ! तिकडे स्वयंपाक घरात… यामिनी प्रतिभाला स्वयंपाकात मदत असते.. स्वयंपाक करता करता जश्या कोणत्याही दोन बायकांच्या गप्पा रंगतात तश्या त्यांच्याही गप्पा रंगलया…
यामिनी : प्रतिभा ! तू मूळची कुठली ?
प्रतिभा : मी लहानाची मोठी रायगडला झाले
यामिनी : मग ! तू रायगड किल्ला पाहिलास कि नाही ?
प्रतिभा : नाही पहिला मॅडम !
यामिनी : रायगडला राहून तू रायगड किल्ला पाहिला नाहीस ! अगं ! मी रायगडावर चार पाच वेळा गेले आहे … तुझ्या गावच्या घरापासून किती वेळ लागेल रायगडावर जायला ?
प्रतिभा : एकदा तास लागत असेल..
यामिनी : आपण काढू एकदा पिकनिक रायगडावर ! आता मी घेऊन जाईन तुला…
यामिनी : बरं तुझ्या घरी कोण कोण असतं ?
प्रतिभा : मी , माझ्या नवरा आणि दोन मुलं, मोठी मुलगी आणि छोटा मुलगा, मोठी मुलगी आता तिसरीला आहे आणि मुलगा पहिलीला…माझं लग्न लवकर झालं ना !
यामिनी : तुझा नवरा काय काम करतो ?
प्रतिभा : आहे एका कंपनीत कामाला…
यामिनी : बाकीचे नातेवाईक ?
प्रतिभा : सासू सासरे असतात गावाला , दोन दीर आहेत त्याची लग्ने झालेली आहेत ते पाहतात त्याचं त्यांचं !
यामिनी : तुमचं घर स्वतःच आहे ना ?
प्रतिभा : नशीब छोटस का होईना आमचं घर स्वतःच आहे नाहीतर या वाढत्या महागाईत मुंबईत राहणं मुश्किल झालं असत.
मॅडम तुमचं आणि साहेबांचं लग्न कधी झालं ?
यामिनी : आमच्या लग्नाला पाच वर्षे झाली …
प्रतिभा : मग ! अजून मुलबाळ का झालं नाही ?
यामिनी : ते आम्हालाच नको !
प्रतिभा : का ?
यामिनी : आहेत आमची आमची काही करणे , सांगेन नंतर कधी तरी तुला सविस्तर… बरं ! तू विजयला कशी काय ओळखतेस ?
प्रतिभा : साहेब पूर्वी ज्या चाळीत राहायचे त्या बाजूच्या चाळीत साहेबांचा मित्र राहतो, तो माझ्या मावशीचा मुलगा ! मी मुंबईला घर काम करू लागल्यावर सुट्टीत त्याच्या घरी जायचे ! साहेब माझ्या मावस भावाला भेटायला यायचे अधून मधून तेंव्हाच आमची ओळख झाली होती.
यामिनी : विजयच्या जवळ – जवळ सर्व मित्रांना मी ओळखते काय नाव काय त्या मित्राचे …
प्रतिभा : अजय !
यामिनी : तू अजय भावोजींची ! मावस बहीण आहेस म्हणजे आमच्या घरातीलच आहेस कि ! अजय भावोजी खूप हुशार आहेत हा ! ते येतात वर्षातून एक दोनदा विजयला भेटायला आमच्या घरी… मी आणि विजय गेलो आहोत त्याच्या नव्या घरात…तुझी वाहिनीही माझी छान मैत्रीण आहे … आमच्यात होत असतात गप्पा अधून मधून…
प्रतिभा : आमच्या आर्थिक परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही … त्याचा आज पश्चाताप होतोय ! मी ही शिकलेले असते तर आज मी स्वतःच्या पायावर उभी असते !
यामिनी : तू फार शिकली नाहीस म्हणून काय झाले ? तू आजही स्वतःच्याच पायावर उभी आहेस ! तू जे काम करतेस ते काही हलके काम नाही ! ते तर सर्वच बायकांना कधी ना कधी करावेच लागते ! पण तुमचे विशेष कौतुक करायला हवे कारण तुम्ही तुमच्या घरातील कामे करून आमच्या घरातील कामे करता . जर तुम्ही आमच्या घरातील कामे केली नाहीत तर आम्हाला बाहेरच्या जगात कर्तृत्व गाजवता येणार नाही ! विजय ! मला म्हणाला कि तू त्याच्या ओळखीची आहेस पण तो मला हे म्हणाला नाही कि तू अजय भावोजींची बहीण आहेस ! प्रतिभा ! तू यापुढे मला मॅडम नको म्हणू ! तू मला ताईच म्हणत जा !
प्रतिभा : बरं ताई ! … ती गालात गॉड हसली ..
यामिनी : बरं ! आता तुझं आवरलं कि तू घरी जा ! आणि मला जरा चहा गरम करून दे ! साहेबांना घेऊन जाते… साहेबांना एक वेळ जेवायला नसेल तरी चालेल पण सारखा चहा लागतो.
यामिनी चहाचा कप घेऊन बाहेर हॉलमध्ये आली आणि तो चहाचा कप विजयच्या हातात देत ..
यामिनी : तू मला सांगितले नाहीस कि प्रतिभा अजय भावोजींची मावस बहीण आहे म्हणून ?
विजय : सॉरी ! सॉरी !! तुला सांगेन सांगेन म्हणालो आणि विसरून गेलो, म्हणूनच तुला मी म्हणालो होतो ,” ती आपल्या घरातल्या सारखीच आहे..
यामिनी : मला एक मोलकरीण हवी होती पण प्रतिभाच्या रूपात बहीणच मिळाली…
प्रतिभा : बाहेर येऊन ! ताई सर्व कामे झाली आहेत , मी आता निघते ! उद्या सकाळी येते…
यामिनी : चालेल ! तू ये आता, जरा उशिरा आलीस तरी चालेल ! तसाही मी काही ऑफिसमध्ये डबा वगैरे घेऊन जात नाही ..
प्रतिभा : बरं !
प्रतिभा निघून गेल्यावर यामिनी सोफयावर विजयच्या बाजूला बसते आणि …
यामिनी : विजय ! प्रतिभा मला विचारत होती कि तुमच्या लग्नाला पाच वर्षे झाली तरी मुलबाळ का नाही ?
विजय : तू काही सांगितले नाहीस ना ?
यामिनी : नाही ! मी काहीही सांगितले नाही…
विजय : सांगूंही नकोस ! तिला ते पचणार नाही…
यामिनी : हा मुलाबाळांचा प्रश्न हल्ली मला आपल्या बाबतीत जवळ जवळ सर्वांच्याच नजरेत दिसतो…
विजय : पण या सगळ्या गोष्टी आपण गृहीत धरूनच लग्न करण्याचा निर्णय घेतला होता ना ?
यामिनी : विजय तू बोलतोस ते बरोबर आहे ! पण हे असे प्रश्न पुरुषांना नाही तर फक्त स्त्रियांना विचारले जातात !
विजय : त्याची मला कल्पना आहे… या विषयावर आपण नंतर चर्चा करू !
यामिनी : बर ! मी जरा आत जाऊन पडते… जेवणाची वेळ झाली की मला हाक मार … मग आपण जेवायला बसू ..
विजय : बरं बाई …
— निलेश बामणे
Leave a Reply