विजय लॅपटॉपवरील त्याचे काम पूर्ण झाल्यावर लॅपटॉप बंद करतो आणि
विजय : यामिनी ! माझे काम आटपलं आहे चल जेऊन घेऊया !
यामिनी : ओके !
यामिनी सर्व जेवणाची भांडी घेऊन बाहेर येते आणि डायनिंग टेबलवर ठेवते आणि दोघे बसून जेवायला सुरुवात करतात…
यामिनी : काय पण बोल हा ! प्रतिभा जेवण करायला लागल्यापासून चार घास जास्त पोटात जायला लागले आहेत
विजय : हो ! ती जेवण अगदी मनापासून करते , आपण जेवण काय फक्त पोट भरायला करायचो !
यामिनी : खरं आहे … आपण इतके पैसे कमावतो पण आपल्याला मनासारखा त्या पैशाचा उपभोगाच घेता येत नाही !
विजय : मला तर कधी कधी ते गरिबीचे दिवस बरे होते असेच वाटत असते, आता कसं यंत्रागात जीवन जगतोय असे वाटते
यामिनी : मी तर स्वतःला यंत्रच समजू लागले आहे … भावना नसलेला… तुला निदान भावना तरी आहेत म्हणजे तू लेखक असल्यामुले निदान लोकांच्या भावनांचा तरी विचार करू शकतोस ! बरं ! मगाशी आपण जे बोललो,” मुलांबद्दल ! प्रतिभाने तोच प्रश्न मला पुन्हा विचारला तर मी उत्तर काय देऊ ?
विजय : तू तिला सरळ सांग कि साहेबाना ! मुलं नकोयत !
यामिनी : त्यावर तिने तुम्हाला असा प्रश्न विचारला तर ?
विजय : त्यावर तू बोलू शकतेस त्यांनाच नको तर मी काय करू… त्यावरही काहीही विचारले तर बोल आता चाळीशीत मुलांना जन्म देऊन आम्ही त्यांना उत्तम भविष्य देऊ शकू असे आम्हाला नाही वाटत…
यामिनी : ठीक आहे !
विजय : आपले साधे सरळ आयुष्य आता किती गुंतागुंतीचे झाले आहे… त्यापेक्षा आपण पुर्वीसारखे एकटेच एकमेकांच्या प्रेमात मजेत होतो … तसेच आयुष्यभर राहायला हवे होतो… पण तेव्हाही घरातले आणि समाज आपल्याला आनंदाने जगू देत नव्हता आता आपण लग्न केलय तरी परिस्थिती मात्र होती तशीच आहे. त्यात काडीचाही बदल झालेला नाही … आणि कदाचित तो बदल कधी होणारही नाही…
यामिनी : हो ! ना ! चल जेव लवकर ! आटपुया आणि झोपूया ! म्हणजे मी जाऊन झोपते तू टी.व्ही. पाहत बस…
विजय आणि यामिनी जेऊन झाल्यवर , यामिनी सर्व आटपून बेडरूममध्ये जाऊन जोपते विजय हॉलमध्ये सोफ्याचा बेड करून टी .व्ही. पाहत असतो… झोप अनावर झल्यावर टी.व्ही. बंद करून तो झोपी जातो…. सकाळी विजय झोपलेला असतानाच प्रतिभा कामावर येते…
यामिनी : साहेब झोपलेत त्यांना उठवू नकोस… रात्री टी.व्ही. जास्त वेळ पाहिलेली दिसतेय ! झोप पूर्ण झाली कि त्याचा तो उठेल…
प्रतिभा : म्हणजे साहेब रात्री येथेच झोपले..
यामिनी : हो ! हल्ली तो रोज येथेच झोपतो… म्हणजे त्याला रात्री उशिरापर्यत टी.व्ही . पाहायची असते ना ! मला ऑफिसला लवकर जायचे असते म्हणून मी लवकर झोपते.
प्रतिभा : ठीक आहे ! मी माझी कामे आवरायला घेते !
यामिनी : माझी तयारी झाली आहे मी निघते … दरवाजा ओढून घे !
प्रतिभा :बरं ! ताई…
यामिनी आता जाऊन आपली कामे करायला सुरुवात करते… भांड्यांचा आवाज ऐकून विजयला जाग येते …
विजय : यामिनी !
प्रतिभा : आतूनच ! ताई ! ऑफिसात गेल्या , तुम्हाला काही हवे आहे का ?
विजय : काही नको ! मी फ्रेश होतो तोपर्यत तू माझ्यासाठी चहा नाश्ता गरम कर …
प्रतिभा : हो ! करते ….
विजय फ्रेश होऊन बाहेर येऊन सोफ्यावर बसतो आणि लॅपटॉपवर काहीतरी टाईप करत असतो इतक्यात प्रतिभा चहा – नाश्ता घेऊन येते.. विजय त्याच्या हातातील लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि प्रतिभाकडे पाहत म्हणतो,” तू ही घे ! चहा नाश्ता… कामे काय होत राहतील…
प्रतिभा : एक विचारू का ? राग नाही ना येणार ?
विजय : विचार की ?
प्रतिभा : तुम्ही दोघे म्हणजे ताई आणि तुम्ही रोज असेच वेगवेगळे झोपता का ? ताईंना भीती नाही का वाटत एकटं झोपायला ??
विजय : भीती आणि यामिनीला ! तिला तर वाघही घाबरेल… प्रतिभा ! तू काल यामिनीला मुलाबाळांन विषयी विचारलेस का ?
प्रतिभा : हो ! असाच बोलता बोलता विषय निघाला म्हणून विचारले
विजय : प्रतिभा ! पुन्हा यामिनीजवळ मुलाबाळांचा विषय नको काढूस ! तिला त्याचा खूप त्रास होतो…
प्रतिभा : पण का ? काय समस्या आहे ?
विजय : यामिनी ठरवूनही आई होऊ शकत नाही… पण ! हे मी तुला सांगितले हे यामिनीला कळू देऊ नकोस…
प्रतिभा : देव पण असा आहे ! ज्याला दात देतो त्याला दाना देत नाही आणि ज्याला दाना देतो त्याला दात देत नाही ! मी यापुढे ताईजवळ मुलाबाळांचा विषय पुन्हा नाही काढणार !
विजय : बरं ! ते जाऊदे ! आता दुपरी भाजी काय करणार आहेस ?
प्रतिभा : कारल्याची करू का ? आज बुधवार आहे , तुमच्या फ्रिजमध्ये अंडी वगैरे नाहीत , नाहीतर भुर्जी केली असती…
विजय : नको ! तू कारल्याची भाजीच कर ! मी मांसाहार करत नाही दहा वर्षांपूर्वीच मी मांसाहार सोडला आहे.. तशीही कारल्याची भाजी शरीराला चांगली असते
प्रतिभा : ताई !
विजय : ती खाते आवडीने ! पण घरी खात नाही म्हणजे तिला करायचा कंटाळा येतो… मी काही तिला घरी करू नकोस अथवा खाऊ नको म्हणालो नाही, तिने माझ्यासमोर बसून मांसाहार केला तरी मला काही फरक पडणार नाही…
प्रतिभा : मग ! ताईंसाठी मी संध्याकाळी येताना तळलेले मासे घेऊन येईन…
विजय : ये की घेऊन ! येथे घरात तिच्यासाठी शिजवले तरी माझी काहीही हरकत नाही… माझ्या जिभेवर आणि मनावर मी आता पूर्ण नियंत्रण मिळविले आहे.
प्रतिभा : बरं ! मी जाते जेवण करायला …
प्रतिभा स्वयंपाक घरात निघून जाते विजय पुन्हा त्याचे डोके लॅपटॉपमध्ये घुसडतो… थोड्यावेळाने स्वयंपाक आटपून प्रतिभा बाहेर येते आणि विजयचा निरोप घेऊन निघते…ती निघून गेल्यावर थोड्या वेळाने विजय स्वयंपाक घरात जाऊन एक प्लेट मध्ये जेवण घेऊन येतो आणि प्रतिभाने बनविलेली कारल्याची भाजी पोळी सोबत चवीने खातो…आणि खाऊन झाल्यावर प्लेट स्वयंपाक घरात नेऊन ठ्वतो … पुन्हा बाहेर आल्यावर थोडावेळ लॅपटॉप मध्ये डोके खुपसून कोणाचा तरी फोन आल्यावर तयारी करून घराच्या बाहेर पडतो…
Leave a Reply