नवीन लेखन...

जोडीदार निवडतांना – भाग १

काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ?

काय करू काही समजत नव्हतं , कोणत्या स्थळाची / वराची निवड करू ? भल्या मोठ्या पगाराची शहरात नोकरी करणारा ,कि गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला , कि प्रगतिशील असलेल्या एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेतकरी असलेला ग्रामीण भागात राहणारा .

अधिक – उणे

भल्या मोठ्या पगाराची नोकरी करणारा निवडला तर , सर्व सुविधांनी युक्त असलेलं आरामदायी आयुष्य जगता येईल ,पण महत्वाचे म्हणजे नवऱ्याचं दिनमान पूर्णपणे घड्याळाने नियंत्रित केलेलं, कौटुंबिक सुख मिळेल का , दिवसाचे काही तास तरी नवऱ्या समवेत घालवता येतील का ? बहुतेक याचे उत्तर “ नाही “ असेच आहे.

गेल्या तीनचार वर्षात स्वतःचा व्यवसाय सुरु केलेला निवडावा तर सुरवातीला आर्थिक चणचण भासू शकते , आरामदायी आयुष्य नाही जगता येणार , व्यवसाय जरी असला तरी आपल्या मनाचे राजे , कुणाची पराधीनता नाही , व्यवसायात नवऱ्याला मदत केली तर निश्चितच त्याच्या समवेत व्यवसाय व्यतिरिक्त वेळ मिळू शकेल , व्यवसाय उत्तम चालला तर आरामदायी आयुष्य हि मिळू शकत .

एखाद्या गावात स्वतःचा जमीन जुमला , बंगला , शेती असलेला निवडला तर – शहरात मिळणाऱ्या सुख सुविधा कदाचित नाही मिळणार , थोडं कष्टमय जीवन हि असू शकेल , पण नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्यांपेक्षा जीवन धकाधकीचे नसेल , जास्तीत जास्त कुटुंबासाठी वेळ नवरा देऊ शकेल . शेवटी लग्न कशासाठी करावयाचे ? आपल्याला नक्की काय हवं आहे ?

अपेक्षा काय ?

लहान पणापासून आपण बऱ्याच गोष्टी शिकत असतो , आणि आता तर काय तंत्रज्ञानामुळे सारं जग आपल्याला पहायला मिळतं. मोठे होतो नोकरी हि मिळते पण आयुष्यातील महत्वाची गोष्टच आपण शिकत नाही ती म्हणजे भावी आयुष्यात आपण काय केलं म्हणजे आपण कायम आनंदी राहू ? समाजातील इतरांची परिस्थिती बघून आपण ठरवतो आपण काय करायचं ! पण खरंतर हेच फसवं असतं कारण यात नुसते अनुकरणता असते विचार नसतो . आणि जिथे विचार नसतो तिथे यशस्विता जन्म घेत नाही . आपण काय केलं म्हणजे , आपल्याला काय मिळाले म्हणजे , आपण आनंदी सुखी राहू याचा प्रामाणिक विचार कधीच करीत नाही , समाजात काय करतात हे पाहूनच आपण ठरवतो , आणि मग कधी कधी असंही होतं कि आपली आर्थिक प्रगती तर खूप केली पण तरीही आयुष्य असं पराधीन , असमाधानी का वाटतं ?

जोडीदाराची निवड

आपण जर कुटुंब वत्सल असू तर लग्न हे ठराविक वयापर्यंतच होणे आवश्यक आहे . हि कुठली रूढी ,परंपरा , संस्कृती वगैरे काही नाही निव्वळ कौटुंबिक व्यवहार आहे आणि तो म्हणजे आईबापाची सेवा निवृत्तीची वेळ येण्या आधी मुलगा / मुलगी मिळवती व्हायला पाहिजे ! नाहीतर होत असं आईवडील खूप वयस्कर होतात आणि मुलगा / मुलगी कॉलेजचे शिक्षण घेत असतो/असते .या मुळे कुटुंबावर म्हणजेच आईवडिलांवर काय परिस्थिती ओढवते हे सुज्ञास सांगणे न लगे . याचा अर्थ असाही नाही कि येईल ते स्थळ स्वीकारायचं आणि आयुष्याची माती करायची आणि या साठीच “ जोडीदाराची विवेकी निवड “ आवश्यक असते.

सर्वसाधारण महत्वाच्या मानल्या गेलेल्या सार्वत्रिक अपेक्षा……….

१) मुलाला चांगल्या कंपनीत मोठ्या हुद्यावर आणि मोठ्या पगाराची नोकरी असायला हवी

२) स्वतःचे मालकीचे राहते घर , मोठा ब्लॉक असेल तर उत्तमच

३) मोठा कौटुंबिक गोतावळा असता नये , सासू सासऱ्यांपर्यंतच ठीक आहे ते वेगळे रहात असतील तर उत्तमच

४) स्वतःचा व्यवसाय असेल तर स्वतःचा बंगला गाडी ( चार चाकी कर } असायलाच हवी

५) मुलगा मोठ्या शहरातच राहणार असायला हवा

६) मुलाकडे कितीही सुबत्ता असली तरी ग्रामीण भागातील नको

 

या आणि अश्या प्रकारच्या अटींनी निवडलेल्या जोडीदाराकडून खरंच वैवाहिक आणि कौटुंबिक सुख आणि समाधान मिळेल का ?

जोडीदाराची विवेक निवड करतांना कोणता विचार , आपला आणि मुलाचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन , आपल्याला नक्की काय पाहिजे याचा स्वतःशी प्रामाणिक विचार यावरील विवेचन लेखाच्या दुसऱ्या भागात

  यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

                                                                                                                                                                                             …….. मालकंस

( मराठीसृष्टीच्या वाचकांनी हा लेख वाचावा आणि त्यावर चर्चा होणे गरजेचे आहे कि विषय अत्यंत नाजूक आणि महत्वाचा वाटतो म्हणून माझ्या स्वतःच्या ब्लॉगवर प्रसिध्ध झालेला लेख )

https://vinatasocial.blogspot.com/

Avatar
About malakans 5 Articles
साधारण 20/ 25 वर्षा पूर्वी मासिकातून , नियतकालिकातून , साहित्य लेखन सध्या facebook ,twitter , whatsapp वरुन वैचारिक लेखमाला वैचारिक चर्चा - अत्यंत आवडता विषय तसेच संगीत साधना , नवीन गाण्यांची निर्मिती food प्रोसेसिंग चे अनेक courses केले .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..