वेस्ट इंडिजचे ज्येष्ठ खेळाडू जोएल गार्नर यांचा जन्म १६ फेब्रुवारी १९५२ रोजी झाला.
जोएल गार्नर ६फूट ८ इंच असली उंची लाभलेला हा गोलंदाज आडदांड असाच होता. आता इतकी उंची लाभली असल्याने त्याचा चेंडू येणार तो कमीतकमी १० ते १२ फुटांवरून!! चेंडू कशाप्रकारे उसळी घेणार आहे, किती उसळणार आहे, याचा अचूक अंदाज वर्तवणे अशक्य – परिणामी यॉर्कर चेंडू हे हुकमी अस्त्र. जरा १९८३ सालचा विश्वकप अंतिम सामना.
आपल्या फलंदाजांनी रॉबर्ट्स, होल्डिंग आणि मार्शल समोर थोडीफार तग धरली होती पण गार्नर समोर नांगी टाकली होती. कुणाही फलंदाजाला गार्नर समजूच शकला नाही आणि अंतिमतः गार्नर सलग ५ विकेट्स घेऊन गेला. खरतर त्याची महाकाय उंची बघूनच फलंदाजाच्या छातीत धडकी भरायची. गार्नरचा यॉर्कर सरळसोटपणे यष्ट्यांचा वेध घ्यायचा. मुळात यॉर्कर म्हणजे पायाच्या बुंध्यात टाकलेला चेंडू, त्यामुळे पायांना हालचाल करायला वाव जवळपास नाहीच आणि तशा अवस्थेत ऑफ स्टम्पच्या किंचित बाहेर पडलेला चेंडू आत येतो म्हणजे फलंदाजांची त्रेधातिरपीट नक्कीच. होल्डिंग इथे अधिक धोकादायक होता.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply