जगातील पहिले अँटीव्हायरस बनवणारे जॉन मॅकॅफी यांचा जन्म १८ सप्टेंबर १९४५ रोजी झाला.
अँटीव्हायरस क्षेत्रातील गुरु तसंच McAfee चे संस्थापक जॉन मॅकॅफी यांनी अमेरिकेच्या तंत्रज्ञान क्षेत्रात महत्त्वाचं योगदान दिलं होतं. मॅकॅफी यांनी जगातील पहिल्या व्यावसायिक अँटीव्हायरसची निर्मिती केली होती.
त्यांच्यावर करचोरीचा आरोप करण्यात आला होता. त्याचबरोबर टेनेसी आणि क्रिप्टोकरन्सी घोटाळ्याबाबतही न्यूयॉर्कमध्ये त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे बऱ्याच काळापासून विविध देशांचे पोलीस त्यांच्या मागावर होते. दरम्यान मागील वर्षी ३ ऑक्टोबर रोजी जॉन मॅकॅफी यांना बार्सिलोना विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलं होतं.
मागील काही वर्षांपासून जॉन मॅकॅफी अमेरिकेच्या तपास यंत्रणांपासून पळ काढत होते. काही काळ ते आपल्या यॉटवरही राहिले आहेत. मॅकॅफी यांनी NASA, Xerox आणि लॉकहीड मार्टिन यांसारख्या अग्रगण्य कंपन्यांसाठी काम केलं होतं.
१९८६ मध्ये जॉन मॅकॅफी यांनी एक बातमी वाचली की, एक पाकिस्तानी कॉम्प्यूटर व्हायरस अमेरिकन कॉम्प्युटर्सचे नुकसान करत आहे. यानंतर, त्यांनी कॅलिफोर्नियाच्या सांता क्लारा येथील आपल्या घरातून McAfee Associates ची सुरूवात केली. जॉन मॅकॅफी यांनी जगातील पहिलं कमर्शिअल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर ‘मॅकॅफी’ बनवलं होतं आणि ते लोकांना विनामूल्य उपलब्ध करुन देण्यासाठी मेसेजिंग बोर्डवर याची जाहिरात केली. त्याची ही आयडिया चालली आणि ते अमेरिकेच्या प्रभावी लोकांमध्ये सामील झाले व तंत्रज्ञान क्षेत्रांत त्याचं नाव मोठं झालं.
जॉन यांनी २०११ मध्ये आपली सॉफ्टवेअर कंपनी इन्टेलला विकली होती. मात्र, सॉफ्टवेअर प्रोग्रॅम अजूनही त्यांच्याच नावानं सुरू आहे. सध्याच्या घडीला जगात 50 कोटी ग्राहक जॉन यांच्या अँटी व्हायरसचा वापर करतात.
जॉन मॅकॅफी आणि त्यांची पत्नी त्यांच्या लक्झरी आणि ग्लॅमरस लाइफ स्टाइलसाठी देखील परिचित होते. दरम्यान, जॉन मॅकॅफी यांनी कॉलगर्लसोबत लग्न केले होते. हे त्याचे तिसरे लग्न होते. काही काळापासून ते तुरुंगात शिक्षा भोगत होते. त्यामुळे नैराश्य आल्यानं २३ जून २०२१ रोजी त्यांनी तुरुंगात गळफास घेऊन आत्महत्या केली.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply