जॉनी लिव्हर यांचे खरे नाव जॉन प्रकाशराव जनुमाला. त्यांचा जन्म १४ ऑगस्ट १९५७ रोजी कनगिरी, आंध्र प्रदेश येथे झाला. आंध्रप्रदेशातील एका तेलगु ख्रिश्चन कुटुंबात जॉनी लिव्हर यांचा जन्म झाला. जॉनी लिव्हर यांचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशचे. त्यांचे वडील प्रकाशराव जानुमाला आणि आई करुणाम्मा यांच्या सोबत मुंबईतील माटुंग्याच्या लेबर कॅम्प-धारावीमध्ये एका चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात राहायचे. ते नकला करायचे. रेकॉर्ड डान्स करायचे. पैसे मिळायचे, ते घरी आईला द्यायचे. ते मित्र-मैत्रिणींना, शिक्षकांना नाचून वगैरे दाखवून खूश ठेवायचा प्रयत्नच करीत. फीचे पैसे नसल्यानं जॉनीला अपमानास्पदरीत्या सातव्या वर्गात असतानाच शाळा सोडावी लागली. मग जगण्यासाठी त्याने काहीही केले.
देशी दारूच्या गुत्त्यात पोऱ्या म्हणून काम केले. फडकी मारली, ग्लास धुतले, रस्त्यात उभं राहून बॉलपेनं, गोळ्या विकल्या. १८ व्या वर्षी हिंदुस्थान लिव्हर या कंपनीत कामाला लागला. काम मिळाले ते स्वीपरचे. झाडू मारणे फरशा पुसणे वगैरे कामे असायची. त्यात एक काम होते रसायनांचे ड्रम उघडण्याचे व ते साफ करून ठेवण्याचे. पहिल्याच वेळी जॉनीने ड्रम उघडला व तो पुसला, त्यात डोके घातलं व उगाच आवाज काढला. तो घुमला. त्याला गंमत वाटली. पुन्हा दुसरा आवाज काढला. नंतर अनेक आवाज काढले.
एका कामगाराने तक्रार केली. मग त्याच्या सुपरवायझरने त्याला जाब विचारण्यासाठी बोलावले. त्याला जॉनीने अनेक नकला करून दाखवल्या. तर तो खूशच झाला आणि त्याने जॉनीला गेट्टुगेदर मध्ये संधी दिली. रंगभवनच्या त्याया संमेलनात शत्रुघ्न सिन्हा, राजेश खन्ना, अशोककुमार आदींची मिमिक्री करून जॉनीने सारे सभागृह दणाणून सोडले. एक हास्याभिनय केला. त्यानंतर जॉनी क्षणात लोकप्रिय झाला. युनियनच्या लीडर, सुरेश भोसलेंनी ते पाहिले व ते म्हणाले, ‘अरे याने तर लिव्हरचा बॅण्ड वाजवला, आजपासून याला जॉनी नाही, जॉनी लिव्हर म्हणायचे.’ त्या दिवशी संध्याकाळच्या कार्यक्रमात जॉनीने स्वतःची ओळख जॉनी लीव्हर अशी करून दिली व तेव्हापासून तेच त्यांचे व्यावसायिक नाव झाले.
कार्यक्रमांचे पैसे बऱ्यापैकी मिळू लागले म्हणून सात वर्षांनी जॉनीने नोकरी सोडली. त्यांच्या कार्यक्रमाची पहिली व्हिडीओ कॅसेट आली होती. नंतर तो कल्याणजी आनंदजी यांचे समवेत जगभर फिरला. जॉनीची चित्रपटात एंट्री झाली, पण अनेक वर्षे ते मी मिमिक्रीच करायचे. त्यांना अभिनयाची संधीच मिळत नव्हती. ती एन. चंद्रांनी ‘तेजाब’मधून दिली. ती भूमिका कशी करायची, तिचे विविध पैलू त्यांनी समजावून सांगितले. त्यात जॉनीने त्याचे रंग भरले. त्यानंतर लोकांनी त्याला अॅधक्टिंग कलाकार म्हणून स्वीकारले. पुढे त्याने ‘दर्द का रिश्ता’ या चित्रपटात काम केले. त्यानंतर मात्र त्याला अनेक चित्रपटात कामे मिळाली. या चित्रपटांची संख्या ४०० हून खूप अधिक आहे.
जॉनी लिव्हर स्टँडिंग कॉमेडी सुद्धा करतात. विनोदी भुमिकेत गाजलेले सिनेमे इश्क, साजन चले ससुराल, जुदाई.
संजीव वेलणकर पुणे.
९३२२४०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply