अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार म्हणून अनंत दीक्षित यांचा जन्म १२ डिसेंबर १९५४ रोजी झाला.
एक अभ्यासू आणि व्यासंगी पत्रकार म्हणून अनंत दीक्षित यांची ओळख होती. पत्रकारितेच्या क्षेत्रात निर्भीड व मनमिळाऊ पत्रकार अशी अनंत दीक्षित यांची ओळख होती. अनंत दीक्षित गेली चार दशके पत्रकारितेमध्ये कार्यरत होते. अनंत दीक्षित हे मूळचे बार्शीचे होते. केसरीतून त्यांच्या पत्रकारितेची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये काम पाहिले. कोल्हापूर ‘सकाळ’मध्ये ते उपसंपादक ते वृत्तसंपादक म्हणून १९८२ ते २००० सालापर्यंत कार्यरत होते. त्यानंतर २०००साली पुणे ‘सकाळ’च्या संपादकपदी ते रुजू झाले. पुणे ‘सकाळ’मध्ये त्यांनी चार वर्षे संपादक म्हणून काम पाहिलं. त्यानंतर पुणे ‘लोकमत’मध्ये ते संपादक म्हणून रुजू झाले. ‘लोकमत’मधून निवृत्त झाल्यावरही ते पत्रकार म्हणून क्रियाशील होते.
वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक म्हणून त्यांनी ठसा उमटविला होता. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्या दीक्षित यांची सडेतोड राजकीय विश्लेषक म्हणून ख्याती होती. अचूक आणि निष्पक्ष मांडणी हे त्यांचं वैशिष्ट्ये होतं. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्यासह अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं होतं.
अनंत दीक्षित यांचे ९ मार्च २०२० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply