हंटर थॉम्प्सन यांचा जन्म १८ जुलै १९३७ रोजी झाला.
हंटर थॉम्प्सन हे ‘गॉन्झो जर्नालिझम’ या नवीन विक्षिप्त संकल्पनेचा जन्मदाता होत. एखाद्या बातमीच्या किंवा घटनेच्या निवेदकाने, स्वतःच त्या घटनेचा किंवा प्रसंगाचा एक भाग होऊन, मनात एकामागोमाग एक उसळून येणाऱ्या विचारांच्या आवर्तनांना दिलेलं शब्दरूप असा काहीसा हा प्रकार. समजायला काहीसा क्लिष्ट. १९५६ ते ५८ अशी दोन वर्षं अमेरिकन एअर फोर्समध्ये काढल्यावर ते पत्रकारितेकडे वळले. हिप्पींची चळवळ, व्हिएतनाम वॉर, ६८ सालची अध्यक्षीय निवडणूक अशा घटनांवर काम करत फिरतीवर असताना त्यांनी प्रस्थापित संस्कृती-संकल्पना झुगारून देऊन बंधमुक्त आयुष्य जगून पाहिलं आणि त्या अनुभवांवर आधारित लेखन केलं.
‘फीअर अँड लोथिंग इन लास व्हेगस’ हे त्याचं नेवाडातल्या अनुभवांवरचं अत्यंत गाजलेलं पुस्तक होय. ‘दी रम डायरी’, ‘दी ग्रेट शार्क हंट’, ‘दी कर्स ऑफ लोनो’ वगैरे त्याची इतर पुस्तकं प्रसिद्ध आहेत.
हंटर थॉम्प्सन यांचे २० फेब्रुवारी २००५ रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply