नवीन लेखन...

जूलियन एसनर- दुसऱ्या महायुद्धातील स्त्री गुप्तहेर

जुलीएन चा जन्म फ्रांस मधील एंगलूर येथे ३० नोव्हेंबर १८९९ रोजी झाला. ती जुजू ह्या नावाने सुद्धा ओळखली जाई.ती फ्रांस व इंग्लंडसाठी हेरगिरी करत होती. तिचे कोड नाव क्लेयर होते. १९२४ मध्ये तिचे लग्न लुएरशी झाले.तिला एक मुलगा झाला. १९२७ साली लुएरचा मृत्यू झाला. तिचे कुटुंब हनोई येथे स्थाईक झाले ती तिथे इंग्लिशची शिक्षिका होती. १९३१ ला ती पुन्हा फ्रांसला परतली व एका चित्रपट कंपनीसाठी पटकथा लेखिका बनली.तिने रॉबट ऐसनरशी लग्न केले.जून १९४१ मध्ये एका जर्मन अधिकाऱ्याला थोबाडीत मारल्याबद्दल तिला दोन महिन्याचा तुरुंगवास झाला.

हेनरी डेरीकोर्ट जो इंग्लंडच्या एसओइ गुप्तहेर संघटनेसाठी काम करत होता,त्याने पॅरिस मधील ऐसनरचे घर शोधले आणि तिला स्पेशल ऑपरेशन्स एक्सेकयूटीव या ब्रिटनमधील दुसऱ्या महायुद्धात सुरू केलेल्या गुप्तहेर संघटनेत कुरियरचे काम करण्यास तयार केले. तिचा साथीदार डेरीकोर्टचे काम होते,विमानांद्वारे आलेले पार्सल टाकण्यासाठी जागा शोधणे. ऐसनरचे  काम होते,एजंटसाठी पॅरिस मध्ये रहाण्याचे सुरक्षित घर शोधणे व त्यांच्यासाठी खोटी कागदपत्रे तयार करणे. तिच्या कामाने प्रभावित होऊन डेरीकोर्टने तिला एसओई मध्ये प्रशिक्षणासाठी पाठवले.प्रशिक्षण घेऊन  ती जिन बेंऑर्ड बरोबर परत आली.

१९४३ मध्ये डेरीकोर्टचे नेटवर्क जर्मनांनी उधवस्थ केले आणि हजारो लोकांना अटक केली. ऐसरने एसओईच्या मदतीने पॅरिसमध्ये केफे मास नावाचे रेस्टॉरंट उघडले ज्यामध्ये गुप्तहेरन्च्या संदेशांची देवाणघेवाण होत  असे. १९४४ मध्ये एसनर व  बेस्नार्द  यांच्या लक्षात आले की जर्मन आपल्यावर पाळत ठेवत आहेत. बेस्नार्दला जाणीव करून दिली की तो अटक होऊ शकतो. बेस्नार्दने एसरला खूप धाडसी ठरवले.  पुढे ती बीबीसी मध्ये सिनेमा सेक्शनमध्ये काम करू लागली. पुढे फ्रांस जर्मनीच्या हातून स्वतंत्र झाल्यावर एसर फ्रांसला परतली.२७ एप्रिल १९४४ बेस्नार्द व एसर यांनी लग्न केले.१३ फेब्रुवारी १९४७ रोजी तिचा कॅन्सरने मृत्यू झाला.

–रवींद्र शरद वाळिंबे

Avatar
About रवींद्र शरद वाळिंबे 87 Articles
मी हौशी लेखक आहे.मी विविध विषयावर लेखन करतो.कथा ललितलेखन व्यक्तिचित्रण हे माझे आवडीचे विषय आहेत.माझे आत्तापर्यंत कथा,ललितलेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यापकी एका कथेला अनघा दिवाळी अंकात दुसरे पारितोषिक व एका कथेला मराठी साहित्य परिषद कल्याण शाखा चे उल्लेखनीय कथाचे पारितोषिक मिळाले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..