अय्या!! जुळी आहेत..??
मग एकसारखीच दिसतात का? दोन्ही एकावेळीच रडतात का?
मग झोप, भूक, आजारपण, एकत्रच असतं का? आणि मुख्य म्हणजे ते ‘जुडवा’ मध्ये दाखवलंय तशाच करतात का तुमच्या..?
आणि.. बापरे! त्यांचं feeding कसं केलं?.. तेंव्हा.. आणि आत्ताही..? तरी बरंय बाबा! एकाच वेळी सगळं आटपून जातं! पण खूप भांडतात का हो?
तुमची फारच धावपळ होत असेल ना हो? घरी कुणी आहे का मग मदतीला? तरी मुलीच आहेत ते बरं आहे तुम्हाला..?
मुली शांत असतात हो, आणि समजूतदारही. आमच्यासारखे दोन दोन धोंडे झाले असते तर..? आणि तसंही एकमेकांसोबत मोठी होतात ही मुलं.. तुम्हाला खेळवायला वगैरे लागतच नसेल…
हं.. अशा एक ना अनेक प्रश्नांना आम्ही जुळ्यांचे आईवडील सामोरे जात असतो. ओह! तुमचेही हेच प्रश्न आहेत का? तर मग तुमच्या सगळ्या प्रश्नांना उत्तरं घेऊन येत आहोत आम्ही..
या नव्या मालिकेत.. ‘जुळ्यांना वाढवताना..’
— प्रज्ञा वझे घारपुरे
Leave a Reply