नवीन लेखन...

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक सुहास भालेकर यांचा स्मृतिदिन. यांचा जन्म दि. ११ ऑक्टोबर १९३१ रोजी झाला.

सुहास भालेकरांनी कारकिर्दीची सुरुवात रंगभूमीपासून केली. त्यांनी सुरुवातीस साबाजी या नावाने लोकनाट्यांतून कामे केली. १९६०-७६ या कालखंडात शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांमधून भालेकर आणि राजा मयेकर या अभिनेत्यांची जोडगोळी गाजली. शाहीर साबळे आणि पार्टीच्या अनेक लोकनाट्यांचे दिग्दर्शन त्यांनी केले . सुहास भालेकर यांनी सहा दशकांहून अधिक काळ नाटक, मालिका, तसंच रुपेरी पडदा गाजवला. कीर्तनकार वडिलांकडून आलेली शुद्ध वाणी, तसंच आई कडून या क्षेत्रात काम करण्यासाठी मिळालेलं पाठबळ यामुळे त्यांच्यातील कलाताराला आपसूकच प्रोत्साहन मिळत गेलं. १९६० ते १९७६ या सोळा वर्षांच्या कालखंडात त्यांनी शाहीर साबळेंबरोबर काम केलं. व्ही. शांताराम यांच्या चानी चित्रपटाद्वारे भालेकरांचा चित्रपटक्षेत्रात प्रवेश झाला. जवळपास ६० हून अधिक नाटकांमध्ये त्यांनी भूमिका करून नाटय़क्षेत्रात प्रदीर्घकाळ आपला ठसा उमटवलाला “पंतांची सून”, “युद्धांच्या सावल्या”,”एकच प्याला”,”तुझे आहे तुजपाशी”,”अंमलदार”,”मी मंत्री झालो”, “बेबंदशाही”,”सासरे बुवा जरा जपून”,”राजकारण गेलं चुली”,”फुटपायरीचा सम्राट”, “सारांश”,”चक्र”;अशा अनेक नाटकातल्या त्यांच्या भूमिका गाजल्या. ”असंभव” या मालिकेतील “सोपानकाका” ही भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिलं. त्याचबरोबर “गोट्या भाकरी आणि फूल”,”कशाला उद्याची बात”,”वहिनी साहेब”,या मालिकेतील त्यांनी साकारलेल्या भूमिका लक्षणीय ठरल्या. तळीराम तर झुंज”, ”चानी”, ”लक्ष्मी”, ”शापित”, ”भुजंग”, ”गंमत-जंमत”, ”बाळाचे बाप ब्रह्म्चारी”, ”बोडक्याचा बाजीराव”,”झंजावात”,”आई”,”निवडुंग”,”अष्टविनायक”,”येड्यांची जत्रा” या मराठी सिनेमातल्या त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या लक्षात राहिल्या. बारीक अंगकाठी असल्याने केवळ विनोदी भूमिका वाट्याला येणारे भालेकर यांनी आपल्या अभिनय कौशल्याने अलेल्या संधीचे सोने केले. सुहास भालेकर यांचे २ मार्च २०१३ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे सुहास भालेकर यांना आदरांजली.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..