आज ज्येष्ठ सनई वादक पंडित अनंत लाल यांचा स्मृतिदिन. यांचा जन्म दि. ३ मार्च १९२७ रोजी बनारस येथे झाला.
सनई हे त्यांच्या कुटुंबात २०० वर्षांहून अधिक काळ वाजवण्यात येणारे वाद्य होते. अनंत लाल यांनी आपले वडील, पंडित मिठाई लाल, तसेच आपल्या काकांकडून वयाच्या नऊव्या वर्षापासून शिकवणी घेतली. पुढे, लाल वाराणसीच्या ठुमरी गायन शिक्षक पंडित महादेव प्रसाद मिश्रा यांचे ते विद्यार्थी झाले. सनई व्यतिरिक्त, अनंत लाल बासरी ही वाजवत असत. मास्टर संगीतकार बिस्मिल्ला खान यांचा आदर्श ठेवून , त्यांनी आपली संगीत कारकीर्द सनईत पुढे नेण्याचे ठरवले.
अनंत लाल हे ऑल इंडिया रेडिओसाठी कलाकार म्हणून १९८७ पर्यंत काम केले.१९७४ मध्ये, शंकर यांनी लाल यांना इंडिया रिव्ह्यू मधील संगीत महोत्सवात सामील होण्यासाठी अनंत लाल यांना निवडले, जो त्या वेळेपर्यंत युरोप मध्ये सादर करणारा सर्वात मोठा भारतीय ऑर्केस्ट्रा होता.१९७६ मध्ये शंकरा यांच्या जोडीसह लाल यांनी संगीत महोत्सवासह युरोपचा दौरा केला. त्यांनी अल्लारा खान, लक्ष्मी शंकर, शिवकुमार शर्मा, हरिप्रसाद चौरसिया, सुलतान खान आणि एल. सुब्रमण्यम यांच्या सोबत वादन केले. त्यांच्या विद्यार्थ्यांमध्ये आधुनिक शहनाई वादक शंजीव शंकर आणि दया शंकर (लालचा मुलगा) यांचा समावेश होता.१९८४ मध्ये लाल यांना उत्तर प्रदेश संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला. १९८९ मध्ये त्यांना राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.अनंत लाल यांचा टी-सीरीजने १९९०’स्प्लेंडर’ नावाचा अल्बम काढला होता. संजीव शंकर (शहनाईवादक), दया शंकर आणि आनंद शंकर, प्रमोद गायकवाड हे त्यांचे प्रमुख शिष्य आहेत.प्रमोद गायकवाड यांनी सनईवर पीएचडी केली आहे.सनईसम्राट शंकरराव गायकवाड आणि पं. अनंतलाल यांच्या बनारसी वादन शैलीचे विवेचन त्यांनी या प्रबंधात केले आहे. गेली अनेक वर्षे प्रमोद गायकवाड हे सनई वादन करतात.
अनंत लाल यांचे ३ मार्च २०११ रोजी निधन झाले.
संकलन – संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
Leave a Reply