नवीन लेखन...

जोत्स्ना भोळे यांना आदरांजली

ठाणे शहराचा संगीताचा इतिहास लिहिला गेला तर मो. ह. विद्यालयाच्या खुल्या रंगमंचावरील दि. २८ एप्रिल १९७४ ची रात्र सुवर्णाक्षरात लिहिली जाईल. कारणही तसेच आहे. कारण त्या रात्री “न भूतो न भविष्यती) असा नाट्यसंगीत मेजवानीचा कार्यक्रम मी स्वत: आयोजित केला होता. त्या रात्री संगीत क्षेत्रातील एकाहून एक सरस आणि दिग्गज गायक-कलावंतांनी आपल्या सुमधुर गायनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रम होता ““नाट्यसंगीत रजनी?या कार्यक्रमात एकाचवेळी, एकाच मंचावर, एकाच रात्री त्याकाळातील लोकप्रिय पं. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, शरद जांक्षेकर, प्रभाकर कारेकर, प्रसाद सावकार, विश्वनाथ बागुल, अलकनंदा वाडेकर (बकुळ पंडीत) जोत्स्ना मोहिले आणि जेष्ठ गायिका जोत्स्ना भोळे असे नऊ गायक गाऊन जेले. हा कार्यक्रम शनिवारी रात्रौ ९ वाजता सुरु होऊन दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता संपला.

१९७४ साली गडकरी रंगायतन नव्हते, त्यामुळे रंगमंचावरील कार्यक्रम न्यु इंग्लिश स्कूल व मो.ह. विद्यालयाच्या खुल्या पटांगणात होत असत. त्यासाठी रसिकांना माहित होण्यासाठी शहरातील चौक-चौकात जाहिरातीचे फलक लावून कार्यक्रमाची जाहिरात करण्यात येत असे. जेव्हा या कार्यक्रमाची जाहिरात लोक वाचू लागले तेव्हा लोकांचा विश्वासच बसेना. कारण एकाच वेळी इतके गायक कलावंत शिवाय जेष्ठ गायिका जोत्स्ना भोळेंचही नांव असल्याने रसिक क्षणभर विचार करीत होते की, या कार्यक्रमाला जोत्स्ना भोळे येतील की नाही? पण त्या कार्यक्रमाला जोत्स्नाबाई मुद्दाम पुण्याहून ठाण्याला आल्या. कार्यक्रमात गायल्या आणि आपल्या मधुर आवाजाने सर्व श्रोतुवर्गाला मंत्रमुग्ध केले.

आज ५ ऑगस्ट जोत्स्नाबाईंचा पहिला स्मृती दिन. गेल्याच वर्षी या दिवशी पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात वृध्दापकाळाने निधन झाले. नेहमीच आपल्या गायनातून अमृताचे बोल गाणाऱ्या, त्या काळात रंगभूमीवर स्त्री भूमीका साकार करणाऱ्या नामवंत जेष्ठ कलाकार यांनी जगाच्या रंगभूमीवरून एक्झीट घेऊन आज एक वर्ष झाले. पण त्यांच्या अनेक गाजलेल्या गाण्यांमुळे रसिकांच्या मनपटलावरून पुसल्या जाणार नाहीत. त्यांच्या लोकप्रियतेचा अनुभव मला वरील कार्यक्रमाच्या निमित्ताने आला. कारण कार्यक्रम संपल्यानंतर अनेक रसिकांनी मला प्रत्यक्ष भेटून जोत्स्नाबाईंना कार्यक्रमात बोलाविल्या बद्दल आभार मानले. तेव्हा बोलताना कळले की, अनेक रसिक हे ठाण्याच्या बाहेरून म्हणजे अंबरनाथ, कर्जत, मुंबई येथून मुद्दाम केवळ जोत्स्नाबाईंचे गाणे ऐकण्यासाठी आल्याचे त्यांनी सांगितले.

वयाच्या पन्नाशीत अत्युच्च शिखरावरील आपली नाट्य कलाकार म्हणून असलेली कारकीर्द स्वखुषीने सोडणाऱ्या जोत्स्नाबाईंनी नंतर काम कधी केले असेल ते १९७५ मध्ये त्यांच्या एकसष्ठीनिमित्त झालेल्या सत्काराला उत्तर म्हणून मूळ जुन्या कलाकारांच्या संचात त्यांनी भाबूमतीची भूमिका साकारली होती. पुढे १९७७ मध्ये पती केशवराव भोळे यांच्या निधनानंतर त्यांनी अल्पकाळ थांबविलेले गाणे पुन्हा सुरू केले होते. नाट्य चित्रपट अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांच्या सत्कार सोहळ्यात सहभाग घेण्यासाठी गेल्या असता त्यांच्या एका मांडीचे हाड मोडले. त्यामुळे त्यांचा तो शेवटचा जाहिर कार्यक्रम ठरला. त्यांना फिरण्याची फार आवड होती. ती आवड त्यांनी स्वतःच्या गायनाचे कार्यक्रम करण्याच्या निमित्ताने बहुतेक संपूर्ण जगाचा प्रवास केला होता.

१९६४ साली आकाशवाणीवर सादर झालेल्या “घराण्याचा पीळ” ही श्रुतीका स्वतः जोत्स्नाबाईंनी लिहिली होती. तीच श्रुतिका नंतर म्हणजे मुंबई दुरदर्शन सुरू झाल्यानंतर दूरदर्शनवर सादर करण्याची खूप इच्छा होती. मूळ श्रुतिकेत संगीतावर श्रध्दा असलेल्या मुस्लीम घराण्-यातील खाँ साहेबांची भ्रूमीका कै. वसंतराव देशपांडे यांनी केली होती. हे फार कमी श्रोत्यांना माहित असेल. जोत्स्ना भोळेंची अशी ही एक आठवण सांगितली जाते की आकाशवाणीवर ऑडीशन न देता गायलेल्या पहिल्याच गायिका म्हणून गणल्या गेलेल्या जोत्स्नाबाईंनी १९३२ मधे बॉम्बे ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशनवर गायलेल्या गाण्यांमधे प्रसिध्द संगित तज्ञ अल्लारखाँयांनी चाली दिलेली गीतेही त्यांनी सादर केली.

जोत्स्नाबाई या मूळच्या गोव्याच्या. गोव्याच्या मातीतच भ्रूमीत गोव्यातील संगित कला वाढली आहे. इथल्या संगीताला स्वतःची परंपरा व प्राचिनत्व आहे. लहान वयात जोत्स्नाबाई प्रथम बृत्याकडे वळल्या होत्या. नंतर त्या गाण्याकडे वळल्या. खादीम हुसेन खाँ, बशीर खाँ, धम्मन खाँ, इनायत खाँ तसेच वझेबुवाकडे त्यांनी शाखोक्त संगीताचे पध्दतशीर शिक्षण घेतले. त्यांचे पुढचे जीवन मुंबई-पुण्यातच > यतीत झाले. त्या रेडीओसाठी गाणी म्हणू लागल्या. १९३०-३9च्या सुमारास जोत्स्नाबाई लॅमिंगटन रोडला चुनामलेन मधील एका फ्लॅदमधे राहत होत्या. समोरच्या इमारतीत वर्तक राहत होते. तेथे के. नारायण काळे, अनंत काणेकर, पार्श्वनाथ आळतेकर, केशवराव भोळे ही मंडळी जमत. यथावकाश केशवराव भोळे जोत्स्नाबाईना भावगीत शिकवायला येऊ लागले. त्यांनी जोत्स्नाबाईना पहिलेच भावगीत शिकविले ते होते काणेकरांचे – “किती गोड गोड वदला, हृदयी गुलाब फुलला? ते ऐकून त्या भावगीतवेड्याच झाल्या. जोत्स्नाबाईनी जुकतीच शिकलेली ही गाणी केसरबाईंना म्हणून दाखविली आणि त्याही इतक्या भारावून गेल्या की, उठता बसता, चहा करताना, भाजी चिरताना, स्वयंपाक करताना परत परत ती जाणी म्हणून घ्यायच्या. नंतर नंतर तर उभ्या महाराष्ट्राला या भावगीतांनी वेड लावले. काही दिवसांतच त्यांनी केशवराव भोळेंशी विवाह केला. १९३२ साली बोलपट सुरू झाल्यानंतर कृष्ण फिल्म कंपनीने संतसखू काढण्याचे ठरविले आणि मुख्य भूमिकेसाठी जोत्स्नाबाईना घेतले. त्याकाळी स्त्रीया विशेषतः मराठी ख्रि-यांनी सिनेमात काम करण्याचे प्रमाण कमी होत. अशावेळी लग्नानंतर ही जोत्स्नाबाई या वाईट समजल्या जाणाऱ्या क्षेत्राकडे वळल्या हे विशेष होते. दुसरे वैशिष्ट्य म्हणजे काळाची ‘पाऊले ओळखण्याची दृष्टी त्यांच्याकडे होती त्यामुळेच मराठी रंगभूमीवर क्रांती आणणाऱ्या “आंधळ्याची शाळा यात काम करण्याची ऑफर त्यांनी तात्काळ स्वीकारली. त्यांनी ते आव्हान स्विकारले. नाटकांच्या जुन्या भरजरी परंपरेचे ठोक नवयुगातील संवेदनाशी भिडविण्याचे काम *आंधळ्यांची शाळा* ने केले. पुढे मराठी रंगभूमीवर दुसरे परिवर्तन आणणाऱ्या नाट्यनिकेतन’ मधून त्यांनी कामे केली या संस्येच्या “कुलवधू तील जोत्स्नाबाईची भाबूमती खूप गाजली. हे नाटक प्रचंड चालले आणि त्यातील जोत्स्नाबाईंचा उत्कट अभिनय व गाणी देखील गाजली. आजही त्यांची नाट्यपदे “भागवती मी त्रिशुववी झाले’, ‘तुझं नी माझं जमेना?, “बहू असोत सुंदर* किंवा “माझिया माहेरा जा पाखरा? गीते पुन्हा पुन्हा ऐकाविशी वाटतात. या गीतांचा विसर पडणे शक्‍य नाही. अशा या थोर जेष्ठ गायिकेला त्रिवार वंदन. !

विद्याधर ठाणेकर

सन्मित्र –  ५ ऑगस्ट २००२

Avatar
About विद्याधर ठाणेकर 16 Articles
विद्याधर ठाणेकर हे ठाणे मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष आहेत. ते मराठी नाट्य परिषदेच्या ठाणे शाखेचे कार्यवाह आहेत. ते ठाण्यातील अनेक सामाजिक संस्थांशी निगडित आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..