का असे जगणे होते,भलतेच कधी जीवघेणे,
वेदनांचे उठती टाहो,
आक्रंदनांचे तीव्र हिंदोळे,
सहावे कुठवर, सोडून द्यावे,
जखमी घायाळपण लपवावे,
कोण त्राता, कोण करविता,
संभ्रमी सारे जीव पडावे,
अगदी अनाकलनीय ना,
आपल्या आयुष्याचे कोडे ,
त्यातून कशी केव्हा सुटका, प्रारब्धाचेच खेळ सारे,–!!!
संयम, नि संतुलन किती,
जागोजागी का दाखवावे,
माणूस म्हणून जगणे मग,
शेवट यंत्रवतच”” बनावे, —
कुठे जातात सगळ्या,
भावना,अन् संवेदना,
जसे या जीवनारण्यी,
ठेचकाळतच फक्त हिंडावे,
माया ममता प्रेम आस्था,
वागणे का असे नसावे,
उथळ, स्वार्थी वरपांगी,
पुरते आयुष्य असेच जावे,–?
लावावा जीव कुणाला,
पदरी येते फक्त फसवणे, तोंडावरती गोड बोलती,
प्रत्यक्षात काही वेगळे,–!!!
ताणतणांवा सीमा नसे ,
दुनिया कशी वेगळे टोचे,
जखमा आणखी खोलत,
वर मीठ चोळण्यां काहीसे, समस्यांना सीमा नसतां,
दोष तरी कुणाला द्यावा,-?
हेच आपले प्राक्तन म्हणत,
— आहे तेच स्वीकारावे,–!!!
© हिमगौरी कर्वे.
Leave a Reply