मानव जीवन तुम्हां लाभले,
महत् भाग्य ते समजावे
कर्म दिधले पाठी तुमच्या,
सद्उपयोगी यांसी करावे….१,
जीवन रेखा मर्यादेतच,
ठेवली असती तुमचे हातीं
जाणीव त्याची मनीं असावी,
कर्म कार्ये जेव्हां करिती…२,
हाती घेतल्या कार्यामध्ये,
एकचित्त तो प्रयत्न व्हावा
काळ केवढा तुमचे जवळी,
याचा विचार सतत यावा…३,
कार्ये राहता अपूर्ण अशी,
वेळ न उरे तुमचे हाती
अभाव असता योजनेचा,
अपयश ते पदरी पडती….४
कार्य व्याप्तीची दिशा असावी,
शक्ती साधन काळ बघूनी
जीवन यशाचा आनंद खरा,
लुटाल तुम्ही हे ध्या जाणूनी…..५
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply