जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी
कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१,
भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील
जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२,
चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत
झडप घाली अचानक तो, जो जो येई त्याच्या टापूत…३,
जरी दिसे मारक कुणीतरी, करवूनी घेतो काळच सारे
विश्वाचा खेळ खेळविण्या, जन्म-मृत्यूचे चक्र फिरे….४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply