कार्तिक कृष्ण अष्टमीला कालभैरवाचा जन्म झाला. म्हणून या दिवशी कालभैरव जयंती साजरी केली जाते. भैरव म्हणजे शैव परिवारातील एक देवता. या कालभैरवाला किंवा भैरवांना शिवांचे अवतार मानले आहे. शैव आगमनात यांचे चौसष्ट प्रकार सांगितले आहेत. आठ भैरवांचा एक वर्ग असे यांचे आठ वर्ग होतात. या आठ वर्गांचे आठ प्रमुख म्हणजे अष्टभैरव होय. या व्यतिरिक्त कालभैरव, बटुकभैरव प्रसिद्ध आहेत. तंत्रग्रंथात यांना चौसष्ट योगिनींचे अधिपती मानले आहे.
महाराष्ट्रात सर्वसाधारण यांना ग्राम दैवत मानले आहे. यांना भैरोबा, बहिरोबा असे म्हणतात. जवळपास प्रत्येक गावात यांचे मंदिर आहे. समर्थ रामदास स्वामीनी यांना क्षेत्रपाल कल्पून यांची आरती रचली आहे. शंकरांच्या क्रोधातून कालभैरवाची उत्पत्ति सांगितली आहे. शंकरांनी ब्रह्मदेवाचे पाचवे मस्तक याच्याकडून तोडविले. नंतर काशीत राहण्याची आज्ञा केली. तेव्हापासून काशीचा कोतवाल म्हणतात. काशीत विश्वेश्वराचे दर्शन घेण्यापूर्वी याचे दर्शन घेण्यास सांगितले आहे. महाराष्ट्रात हरिहरेश्वर येथे उत्तम मंदिर आहे.
प्रार्थना मंत्र –
कपालमालिकाकान्तं ज्वालापावकलोचनम् ।
कपालधरमत्युग्रं कलये कालभैरवम् ॥
Leave a Reply