स्टेटस अपलोड करताच एका मिनिटात कमीत कमी 15 – 20 views.
फेसबुकला जवळपास 1000 मित्र.
खूप भारी वाटतं एवढे मित्र आहेत हे पाहिल्यावर,
पण खूप वाईट वाटत जेव्हा हे लक्षात येत कि जे जुने मित्र आहेत त्यांना कधी मी आठवतच नाही आणि जे आहेत ते फक्त तोपर्यंत जोपर्यंत त्यांच्या सोबत आहे… नक्की मी कुठे चुकतो, जेथे असतो तिथले मित्र खूप जवळीक करतात पण तोपर्यंत जोपर्यंत तिथे आहे, नंतर का नाही… नंतर का एखादा अनोळखी बनतो त्यांच्यासाठी.. चुकत तरी काय माझं….?
कुणी म्हणत तू सेल्फीश आहे तर कोणी म्हणत खूप caring आहेस…
कोणी म्हणत तू खूप पुढचा आहेस… कोणी म्हणत चांगला आहे तर कुणी वाईट… नक्की मी कसाय हे कुणालाच कस कळलं नाही अजून..? मी कुठे चुकलो ज्यामुळे माझेच मित्र माझ्याबद्दल वेगळं वेगळं बोलतेत …? खरंच काय चुकीचं वागलो.. कुठे चुकतो मी …..??? काय चुकत नक्की माझं…..?
Leave a Reply