नवीन लेखन...

कबीर बेदी

कबीर बेदी,फिल्म इंडस्ट्रीतील हे असं नाव आहे,जो आपलं आयुष्य नेहमी आपल्या अंदाजात जगत आला आहे. त्यांचा जन्म १६ जानेवारी, १९४६ रोजी लाहोर(पाकिस्तान)मध्ये झाला.या व्यक्तीने कधीही सामाजिक आदर्शांना महत्त्व दिले नाही किंवा व्यवहारिक नैतिकेवरही विश्वास ठेवला नाही.मॉडेलिंग क्षेत्रातून आपल्या करिअरला सुरुवात करणारे कबीर बेदी आपल्या काळातील सुंदर स्त्रियांना आकर्षित करण्यात नेहमीच यशस्वी राहिले.करिअरमध्ये ते आपल्या समवयीन अभिनेत्यांपेक्षा नेहमी वेगळे ठरले.कबीर बेदींनी केवळ बॉलिवूडमध्येच नव्हे तर परदेशातही काम करुन नाव आणि प्रसिद्धी मिळवली.भारतात परतल्यानंतर ते हिप्पी लाइफ स्टाइल आणि अनेक स्त्रियांसह असलेल्या संबंधांमुळे नेहमीच चर्चेत राहिले.

गेल्या वर्षी आपल्या ७०व्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी म्हणजे १५ जानेवारी २०१६ रोजी त्यांनी त्यांच्यापेक्षा वयाने २९ वर्षांनी लहान गर्लफ्रेंड परवीन दोसांजसोबत लग्न केले होते. खास गोष्ट म्हणजे,त्यांची चौथी पत्नी परवीन(वय 42 वर्षे)त्यांची मुलगी पूजा बेदी(वय 46 वर्षे)पेक्षा चार वर्षांनी लहान आहे. परवीन ही ब्रिटीश वंशाची अॅक्ट्रेस आणि मॉडेल आहे.गेल्या दहा वर्षांपासून ती कबीर बेदींसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती.

कबीर बेदी हे सत्तरच्या दशकात ‘कच्चे धागे’ चित्रपटानंतर हिंदीत आपली मागणी कमी होत चालल्याचे लक्षात येताच, हॉलीवूडला गेले व ‘सांदोकन’ या विदेशी चित्रपटातून भूमिका साकारत तेथे आपला जम बसवला. त्यांना त्याच्या हँडसम व्यक्तिमत्त्वाचा भरपूर फायदा झाला; पण त्या काळात कबीर बेदी विदेशात गेले म्हणजे नेमके काय करतात याची इकडे काहीही कल्पना येत नव्हती. काही प्रतिष्ठित इंग्रजी मासिक वगळता कबिर बेदी यांचा शोध घेणे फारसे कोणाला गरजेचे वाटले नाही. चार लग्न,तीन घटस्फोट,तीन मुले आणि दोन नातवांचे आजोबा असलेले कबीर बेदी मनाने आजही तरुणच आहेत.

संजीव वेलणकर पुणे
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट

 पूजा
poojapradhan323@gmail.com
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..