कधी कधी थकत जातं मन
विचारांच्या अगणित काहूरात
तरीही उरतात अनेक प्रश्न सारे
अर्धवट अनाकलनीय गूढ आवर्तनात
मनाला क्षीण होतो हलकासा
आणि विखुरतात आवेगांचे वारु
पडझड होते अनंत कथांची
उरतात मागे वेदनांचे तेच वारु
खोल तळाचा गाभा अंधारुन जातो
उध्वस्त मनात काट्याचा घाव बोचतो
तरीही राहतात अनेक प्रश्न अनुत्तरित काही
उत्तरांची काजळ रेघ निसटते त्या घनगंभीर रात्री
मन हरवत की हरकत कळत नाही
आईच्या शब्दांची मात्रा अल्लड वयात उलगडत नाही
उशीर होतो वेळ निसटून अलगद जाते
या मनाचे त्या मनाला उलगडत नसते
पैलतीरी संध्या अवचित आयुष्यात येते
सांज दिवा लावतांना वेळ सरत जाते
नको होतात साठवणी हरवून जाणाऱ्या
आयुष्यात येणाऱ्या चिंता जातात वाढणाऱ्या
मनःशांती ढळत जाते अलगद काळ डोहात
दूर हरवतात वाटा आल्हाद पाचोळ्यात
रडवून जाते वेळ कातर संध्या धूसर होते
आईच्या आठवणीत मग नयन पैल लागते
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply