फाल्गुन व चैत्र महिन्यात आपल्या शरिरातील कफाचे प्रमाण निसर्गत: वाढत असते असे रंगकिरण चिकीत्सेत सांगितले आहे.म्हणून ह्या महिन्यांमधे सकाळी अनाशा पोटी पिवळ्या व गर्द निळया रंगाच्या बाटलीत सुर्य प्रकाशात चार्ज केलेले पाणी सम प्रमाणात मिसळून एक डोस सकाळी आणि रात्री एक डोस घ्यावा असे सांगितले आहे. त्या प्रमाणे मी गेली तीस वर्ष करत आहे.त्यामुळे ह्या दिवसात शरीर हलके राहते आळस व खोकल्याचा त्रास होत नाही.
ज्यांना पाणी चार्ज करणे जमत नाही त्यानी रात्रभर पोटाला गर्द निळे व छातीवर पिवळे स्वस्तिक लावावे फायदा होतो.
तसेच ह्या दिवसात कडूलिंब व साखर किंंवा गूळ कालवून खाल्ला तरी उपयोग होतो. तसेच सुंठसाखर खाल्लीतरी फायदा होतो. ह्या दोन्ही महिन्यांचा केद्रबिंदु म्हणजे गुढी पाडवा. गुढीला कडूलिंब व साखरेची गाठी. हे गुढी उतरवयानंतर आपण खाण्यासाठी आहे.
तसेच राम नवमी व हनुमान जयंतीला प्रसाद काय तर सुंठसाखर.! ह्या दिवसात हे पदार्थ ह्या दिवसांतील औषध आहे आणि हे औषध एकदातरी पोटात जावेत म्हणून आमच्या पूर्वजानी देवाच्या नावे ह्या प्रथा पाडल्या आणि समाजाचे आरोग्य राखण्याचा प्रयत्न केला. ते अडणी, मागासलेले नक्कीच नव्हते.
— अरविंद जोशी B.Sc.
ह्या लेखात सांगितलेल्याला ग्रंथाधार आहे का नाही हे मला माहीत नाही.मला आलेल्या अनुभवांवरून माझे विचार मांडले आहेत
Leave a Reply