काही असले नसले,
तरी आनंदातच जगावे,
काय आणले, काय न्यायचे, सर्वांनाच आहे ठांवे ,–!!!
,मी मी करत करत,
कमरेला बांधून गोष्टी,
पैसाअडका, सोने-नाणे,
सारे ठेवायाचे पाठी ,–!!!
शेतीवाडी, जमीनजुमला,
भाईबंद हक्क सांगती,
भाऊबंदकी होऊन निव्वळ,
तुटतात सगळी नाती गोती,–!!!
हे माझे ते तुझे,
कशासाठी, आपपरभाव,-?
स्वार्थ आपमतलब शेवटी,
करून दु:खी होतो मानव,–!!!
सख्खे, सख्खे न राहती, परस्परांच्या जिवांवर उठती,
आपल्या पोळीवर तूप ओढुनी, दुसऱ्यास वाईट ठरवती,-!!!
काय मिळते असे करून,
जीवनी फक्त ताण तणाव,
शरीर मन नसते धड,
दुखण्यानाही चढतो भाव,–!!!
जगण्यातलानिखळआनंद निसर्गात खूप दडला असे,
पदोपदी शिक्षण देई ,
निसर्गासारखा गुरु नसे,–!!!
प्रत्येक घटक त्याचा,
त्याग समर्पण शिकवे, माणूस राही किती अडाणी, त्याचीभाषा समजत नसे,
हिमगौरी कर्वे.©
Leave a Reply