काही राहिलेले काही सुटलेले
प्रश्नच ते तुला कळतील का रे?
काही मोहरलेले काही बहरलेले
क्षणच ते तुला समजतील का रे?
काही उमललेले काही फुललेले
भावच ते तुला उमजतील का रे?
काही मंतरलेले काही गुंफलेले
मनच ते तुला कळेल का रे?
काही धडधडणारे काही लाजणारे
हृदयच ते तुला कळेल का रे?
काही व्यक्तसे काही अबोलसे
शब्दच ते तुला उलगडेल का रे?
काही खुणावणारे काही बोलणारे
डोळेच ते तुला जाणवतील का रे?
काही गंधाळणारे काही धुंद होणारे
स्पर्शच ते तुला भावतील का रे?
काही सांडलेले काही ओवलेले
मोतीच ते स्वातीचे तुला कळतील का रे?
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply