टोयोटा कंपनीचे संस्थापक काईचिरो टोयोटा यांचा जन्म ११ जून १८९४ रोजी झाला. काईचिरो टोयोटा म्हणजेच काईचिरो टोयोडा हे जपानमधल्या औद्योगीक क्रांतीचे जनक समजले जातात. त्यांचे महत्वाचे संशोधन म्हणजे ऑटोमेटेड विव्हींग मशिन, ज्याला आपण ‘पॉवर लूम’ म्हणतो यात होते. या मशिनमुळे वस्त्र उद्योगात क्रांती घडवून आणली. नवनवे शोध लावले. त्यांनी वाहन क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात योगदान आहे.
काईचिरो टोयोटा यांनी २८ ऑगस्ट १९३७ साली टोयोटा ह्या कंपनीची सुरुवात केली, त्याशिवाय जपान बाहेर वाहनांचा व्यवसाय नेण्यात काईचिरो यांचे मोठे योगदान आहे. टोयोटाचा लोगो पाहिले असता त्यांच्या लोगोच्या प्रत्येक अक्षरात त्यांच्या आडनावाचे प्रतिबिंब दिसते.
सुरुवातीला टोयोडा असे ह्या लोगोचे नाव ठेवण्यात आले होते. तर नंतर ते बदलून टोयोटा ठेवण्यात आले. ‘डा’ पेक्षा ‘टा’ चा उच्चार लोकांना आवडला म्हणून टोयोटा म्हणायला सुरुवात केली. पण याहूनही महत्वाचे कारण असे होते जपानी भाषेत टोयोटा नाव लिहिताना ८ अक्षरात लिहिले जाते. ८ हा आकडा जपानमध्ये अत्यंत ‘लकी’ समजला जातो. ८ चा आकडा वर्षानुवर्षं प्रगती आणि सातत्य दाखवतो. म्हणून ‘टोयोडा’च्या ऐवजी ‘टोयोटा’ हेच नाव कायम करण्यात आले. केवळ यासाठीच काईचिरो टोयोडा ओळखले जातात असे नाही. त्यांनी औद्योगिक क्षेत्राला नव्या पध्दतीने विचार करायला शिकवले. त्यांची ‘Five whys’ ही संकल्पना आजही उद्योग जगतात ‘लिन मॅनेजमेंट’चा महत्वाचा भाग समजली जाते.
काईचिरो टोयोडा यांचे निधन २७ मार्च १९५२ रोजी झाले.
https://www.youtube.com/watch?v=UPcF34aVUvo
https://www.youtube.com/watch?v=luS3VBrbGZw
https://www.youtube.com/watch?v=3MFjfo2W6FQ
संजीव वेलणकर
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply