प्रकाश देण्याच सामर्थ्य प्राप्त असलं,
तरीही काजवाच तू!
तेंव्हा,
उगाच पेटत्या मशालीवर झेप घेऊन,
तिला विझविण्याचा,
केविलवाणा प्रयत्न करू नकोस,
लक्षात ठेव!
ती धगधगती मशाल आहे,
तेव्हा,
आहुती तुझीच जाणार आहे.
मशाल ती मशालच,
पेटेल आणि पेटवेलही,
अनेक मशालींना ,
आणि
धगधगत ठेवेल ती ज्वाला,
प्रकाशासाठी युगेणयूगे ,
लेखनातून, विचारातून,
तर कधी,
व्यक्त होऊन सडेतोडपणे,
अंधार गिळण्यासाठी.
तेव्हा तू फक्त,
तूझ्या प्रकाशाचा वापर कर ,
तुझे पोट भरण्यासाठी,
तुझे अस्तित्व टिकविण्यासाठी,
जगाला प्रकाश देण्याचा,
विचार देखिल करू नकोस,
कारण विश्व अफाट आहे ,
आणि
तू फक्त काजवा आहेस,
गतीमंद आणि मतीमंद सुद्धा .
फार फार तर,
तू शृंगारलंकार बन,
तिचा केसारंभ गजरा खुलवण्यासाठी,
एका लावण्यवतीचा,
पुर्वी, राणी-महाराणी,
सुंदरी आणि नर्तिकाही,
तेच करीत होत्या,
लावण्य खुलवत होत्या,
आणि म्हणूनच,
इतिहासानेही दखल घेतली,
तुझ्या प्रकाशाची,
शेवटी तूही प्रकाशाचा,
एक स्ञोत आहेसच,
पण लक्षात ठेव,
तू फक्त काजवा आहेस.
-–ॲड सर्जेराव साळवे,
69, राज नगर मुकुंदवाडी औरंगाबाद
मो.नं,: ८८०५०१३०८४
Leave a Reply